गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा उपविभागीय पोलीस पथक यांची सुगंधीत तंबाखु / गुटखा विक्री व्यवसायकावर धडाकेबाज कारवाई

एकूण 5 लाख 46 हजारावर माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

उपविभागीय पोलीस अधीकारी कार्यालय, वर्धा येथे दिनांक 19.08.2023 रोजी कार्यालयीन कामकाज करीत असतांना मिळालेल्या खबरे वरून वर्धा उपविभागीय कार्यलयातील पथक यांना मिळालेल्या माहीतीवरून यातील आरोपी नामे फयाज खलील शेख रा. वार्ड न. 26 पुलफैल, वर्धा यांचेवर संगधीत तबांखु / गुटखा पानमसाल संबंधी रेड केला असता आरोपी यास पोलीस आल्याची चाहुल लागताच पसार झाला आरोपीचे घरझडतीतुन व त्याचे घरासमोर उभी असलेली 1 ) एक चारचाकी वाहन क्र. एमएच 6 ए. बाजुलएस 6916 हह्युन्डाई आय 10 फिकट सोनेरी रंगाची की. 3,50,000/- रू या वाहना मधुन 2 ) 09 प्लॉस्टीक चुगंडी मध्ये जनम कंपनीचे सुंगधीत तबाखु प्रत्येकी चुंगडी मध्ये 500 ग्रॅम वजनाचे 22 पॉकेट, असे एकुन 198 पॉकेट, प्रती नग कि. 300/- रू प्रमाणे 59,400 /- रू 3) एका मोठया प्लॉस्टीक चुगंडी मध्ये राज निवास कंपनीचे सुंगधीत पान मसाला चे 117 पॉकेट, प्रती नग कि 250 /- रू प्रमाणे 29250 /- रू. 4) एका प्लॉस्टीक चुगंडी मध्ये पान पराग प्रिमीयर कंपनीचे सुंगधीत पान मसाला चे 116 पॉकेट, प्रती नग कि. 250/- रू प्रमाणे 29,000/- रू. 5) एका प्लॉस्टीक चुगंडी मध्ये जाफरानी जर्दा प्रिमीयर कंपनीचे सुंगधीत तंबाखु चे 157 पॉकेट, प्रती नग कि. 70/- रू प्रमाणे 10,990 /- रू 6) एका लहान प्लॉस्टीक चुंगडी मध्ये विमल पान मसाला जुबा केसरी सुंगधीत पान मसाला चे 40 पॉकेट, प्रती नग कि. 250 /- रू प्रमाणे 10,000 /- रू 7) एका लहान प्लॉस्टीक चुंगडी मध्ये वी – 1 सुंगधीत तबाकु चे 40 पॉकेट, प्रती नग कि. 50/- रू प्रमाणे 2,000/- रू 8) एका लहान प्लॉस्टीक चुंगडी मध्ये बाबा ब्लॅक सुगंधीत तबांखु कंपनीचे 500 ग्रॅम वजनाचे टीनाचे डब्बे 5 नग प्रती नग कि. 2,000/- रू प्रमाणे 10,000/- रू. 9) एका लहान प्लॉस्टीक चुंगडी मध्ये भाग्य तबांखु 50 ग्रॅमचे 16 पॉकेट, प्रती नग कि. 60/- रू प्रमाणे 960 /- रू. 10) एका लहान प्लॉस्टीक चुगंडी मध्ये रत्ना तबांखु 50 ग्रॅमचे 4 टिनाचे डब्बे, प्रती नग कि. 100 /- रू प्रमाणे 400 /- रू. 11 ) एका लहान खरडर्याचे खोक्या मध्ये भगवती तबांखु 30 ग्रॅम वजनाचे 8 टिनाचे डब्बे, प्रती नग कि. 100 /- रू प्रमाणे 800 /- रू. 12 ) तीन लहान खरडर्याचे खोक्या मध्ये सागर शक्ती तबांखु 40 ग्रॅम वजनाचे 30 टिनाचे डब्बे, प्रती नग कि. 120 /- रू प्रमाणे 3600 /- रू 13) एका लहान खरडर्याचे खोक्या मध्ये रत्ना तबांखु ( न 3000) लिहलेले 50 ग्रॅम वजनाचे 10 टिनाचे डब्बे, प्रती नग कि. 150/- रू प्रमाणे 1500/- रू. 14) एका लहान प्लॉस्टीक चुंगडी मध्ये गोल्ड तबाखु 500 ग्रॅम वजनाचे 9 पॉकेट, प्रती नग कि. 350/- रू प्रमाणे 3150 /- रू 15 ) एक खर्रा तयार करण्या करीता लोखंडाची बनवलेली इलेक्ट्रीक मशीन कि. 15,000 /- रू 16) एक खर्रा तयार करण्या करीता मिक्सर इलेक्ट्रीक मशीन कि. 20000/- असा एकुन जु. की.. 5,46,060 /- रू चा माल जप्ती पंचनामा प्रमाणे कार्यवाही केली.

त्यावरून पो.स्टे. वर्धा शहर येथे दिनांक 21/08/23 रोजी अपराध क्र 995/2023 अन्न सुरक्षा मानदे कायदा 2006 व नियमन 2011 चे कलम 26(1), 26(2).(iv),.27(3).(E).30(2)(A).3(1). (ZZ) (iii) शिक्षापात्र कलम 59 नुसार तसेच कलम 328,272,273,188 भा.द.वि अन्वये नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पो.स्टे. वर्धा शहर येथील पोलीस अधिकारी क्रर्मचारी करीत आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. नुरूल हसन सा मा. अपर पोलीस अधिक्षक श्री सागर कवडे सा. याचे विशेष मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा, श्री प्रमोद के. मकेश्वर सा. याचे सुचनेप्रमाणे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाचे पो.उप.नि परवेज खॉन, पो. हवा. अमर लाखे, पो.शि. पवन निलेकर, मंगेश चावरे, समीर शेख, राजु वैदय, संदीप अलोने यांनी यशस्वी रित्या पार पाडली.

( प्रमोद के. मकेश्वर ) उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये