ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

त्या पोलिसाला निलंबित नाही,बडतर्फ करा

गडचांदूर सकल मुस्लिम समाजाची मागणी ; दिल्लीतील नमाज़ प्रकरण ?

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

       दिल्लीतील इंद्रलोक परिसरात एका ठिकाणी रस्त्याच्या बाजूला काही मुस्लिम बांधव शुक्रवारी नमाज पठण करीत असताना तेथील एका पोलीस कर्मचाऱ्याने गैरवर्तन करत नमाज पठण करणाऱ्या तरुणांना लाथा मारल्या.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून घटनास्थळी उपस्थित लोक भडकले व गोंधळ सुरू झाला.सदर प्रकरणी मुस्लिम समाजात संतापाची लाट उसळली असून निषेध व्यक्त केला जात आहे.घटनेनंतर सदर पोलीस कर्मचाऱ्याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले.मात्र या पोलिसाला निलंबित न करता थेट सेवेतून बडतर्फ करावे, अशी मगणी गडचांदूर सकल मुस्लिम समाजातर्फे करण्यात आली आहे.यासंदर्भात गडचांदूर येथील ठाणेदारांमार्फत केन्द्रीय गृहमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आला आहे.

       नमाज पठणाचा एक भाग म्हणून परमेश्वरा समोर नतमस्तक होणे.या मूद्रेत असताना पोलीस कर्मचाऱ्यांने मागून लाथ मारून नमाज पठणाला मज्जाव केला.कायद्याने नमाज नंतरही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करता आली असती. परंतू एका विषेश समुदायाबद्दल सदर पोलिसाचे वर्तन अत्यंत नीच प्रवृत्तीचे व निंदनीय असल्याचे व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून समोर येत आहे.असे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

         कावड यात्रा व विविध सण-उत्सव दरम्यान कितीतरी वेळ हायवे जाम करण्यात येते,आवश्यकता पडल्यास मार्ग बदलण्यात येते,सार्वजनिक रस्ता जाम करण्यात येतो,तेव्हा अशा प्रवृत्तीच्या पोलिसांना हे दिसत नाही का ? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला असून अशा नीच प्रवृत्तीचा सुज्ज्ञ समाज कदापी समर्थन करणार नाही.

भारतीय घटनेने सर्व धर्मीय लोकांना आपापल्या धर्माचे आचरण करण्याची मुभा दिली आहे.एक व्यक्ती जेव्हा पोलीस दलात भरती होतो.तेव्हा,घटनेला अनुसरुन कर्तव्य बजावण्याची शपथ दिली जाते.कदाचित सदर पोलीस कर्मचाऱ्याला याचे भान नसावे ? समाजा,समाजात तेढ निर्माण करून सामाजिक वातावरण खराब करणाऱ्या अशा पोलिसाला निलंबित न करता थेट याला सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी गडचांदूर सकल मुस्लिम सामाजाकडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस(श.प.)जिल्हा महासचिव रफिक निजा़मी,महेताब शेख सर,महोम्मद साबीर, सैय्यद कुतबुद्दीन,साहेब अली ठेकेदार,अनीस कुरेशी,पत्रकार सैय्यद मुम्ताज़ अली,शेख मौलाना,अब्दुल करीम निजामी,अजी़म बेग, कय्युम खान,नजी़र खान इतरांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये