ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चांदा पब्लिक स्कूल येथे कृष्णजन्माष्टमी उत्साहात साजरी

चांदा ब्लास्ट

आपली भारतीय संस्कृती, परंपरा व इतिहास यांची ओळख नवीन पिढीला व्हावी तसेच समाजात एकता, सहकार्य व आनंदाने जगण्याचा संदेश विद्यार्थ्यांपर्यत पोहचविण्यासाठी चांदा पब्लिक स्कूल येथे कृष्णजन्माष्टमी जल्लोषात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरूवात प्रमुख अतिथी सौ. देवश्री प्रदीप शास्त्रकार, सौ. स्नेहा धकाते, सौ. सोनम मडावी, श्री. शुभम सिंग राजपुत, शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जीवतोडे आणि प्राचार्या सौ. आम्रपाली पडोळे यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने व श्रीकृष्णाच्या प्रतिमेला वंदन करून करण्यात आली व मधूर असे गित गायन करून श्रीकृष्ण पालणा करीत कृष्ण जन्म साजरा करण्यात आला.

त्यानंतर पुर्व प्राथमिक विभागात गोकुळाची अनुभूती करून देणारे सर्व विद्यार्थी, जे कृष्ण आणि राधेच्या वेशभूषेत आले होते त्या सर्वांनी लोकमत मंच द्वारा आयोजित वेशभुषा स्पर्धेत भाग घेतला.

विद्यार्थ्यांमध्ये बंधुभाव निर्माण व्हावा म्हणुन दहीहांडीचे आयोजन करण्यात आले. त्यात इयत्ता 1ली व 2रीच्या विद्यार्थ्यांनी आपला उत्स्फूर्त सहभाग दाखविला व त्यात सर्व यु.के.जी., एल.के.जी. व नर्सरी चिमुकल्यांचा उत्साह पाहायला मिळाला.

त्यानंतर वेशभुषा स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

सर्व विद्यार्थ्यांनी फुल न फुलाची पाकळी म्हणून जे साहित्य आणले होते ते एकत्र करीत त्याचा गोपाळकाला करून तो सर्वांनी ग्रहण केला व समानतेचा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कार्यक्रमाचे मुख्य अतिथी शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जिवतोडे यांनी बालगोपालांचे कौतुक केले. शाळेच्या प्राचार्या सौ. आम्रपाली पडोळे यांनी तर चिमुकल्यांसोबत तल्लीन होऊन दहीहांडी कार्यक्रमाचा आनंद घेतला व आपण सर्व एक आहोत हा समानतेचा संदेश मुलांना दिला.

हा कार्यक्रम पुर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ. शिल्पा खांडरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षिका मनिषा नागोशे व दुर्गा जोरगेवार यांनी तर आभार प्रदर्शन रिना शाह यांनी केले. कार्यक्रम यशस्विरित्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आपले मोलाचे सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये