ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावतीत शिवसेनेतर्फे भव्य दहीहंडी महोत्सव उत्साहात

पुरुष गटात जय महाकाली ग्रुप चंद्रपूर तर महिला गटात गोपिका महिला ग्रुप बल्लारपूर विजेते

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे

गोकुळाष्टमीच्या निमित्ताने भद्रावती शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानावर बंगाली कॅम्प येथे शिवसेना लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात शिवसेना वरोरा-भद्रावती तर्फे भव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

या महोत्सवास राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय तसेच कामगार राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहिले. त्यांच्या उपस्थितीत सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडलेला हा सोहळा जिल्ह्यातील नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

पुरुष गटातील जय महाकाली ग्रुप, चंद्रपूर यांनी २६ फूट उंच दहीहंडी फोडून प्रथम क्रमांक पटकावला, तर महिला गटातील गोपिका महिला ग्रुप, बल्लारपूर यांनी २१ फूट दहीहंडी फोडत विजेतेपद मिळविले. उमरेडच्या जय महाकाल ग्रुपने १६ फूट दहीहंडी फोडून द्वितीय क्रमांकाची नोंद केली.

दहीहंडीबरोबरच पारंपरिक कलेला व स्थानिक प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. रांगोळी स्पर्धेत ठिपक्याच्या रांगोळीत प्रतिभा भोयर (प्रथम), सीमा आगलावे (द्वितीय) व मोनिका डाखरे (तृतीय) ठरल्या. संस्कार भारती रांगोळीत माधुरी रॉय (प्रथम), जयश्री देशकर (द्वितीय) आणि पिंकी दास (तृतीय) विजेते ठरल्या. निवडक सहभागींना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली.

वेशभूषा स्पर्धेत ‘मा. यशोदा’ साकारताना प्रियंका बोबडे प्रथम, पुनम आडे द्वितीय व नम्रता पोटे तृतीय ठरल्या. श्रीकृष्ण वेशभूषेत २ ते ६ वयोगटात आर्या मोरे प्रथम, विहान मामीडवार द्वितीय, संजीवन पवार तृतीय आले. सात ते अकरा वयोगटात नीत्विक डंभारे (प्रथम), प्रशिल आगलावे (द्वितीय) व पियुष रॉय (तृतीय) ठरले. राधा वेशभूषेत दोन वेगवेगळ्या वयोगटांत नाविका डंभारे, मीरा चौधरी, शिफा पवार, शर्वरी बोधले व मानसी परमानी यांनी अनुक्रमे विजेतेपद प्राप्त केले.

संपूर्ण विजेत्यांना रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच या प्रसंगी भद्रावती शहरातील ७० महिला भजन मंडळांचा विशेष सत्कार आकर्षक भेटवस्तूंनी करण्यात आला.

महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ संघटक किरण पांडव, लोकसभा संपर्कप्रमुख मंगेश काशीकर, जिल्हाप्रमुख बंडू हजारे, युवासेना पदाधिकारी हर्षल शिंदे, युवासेना जिल्हाप्रमुख आलेख रट्टे, कामगार सेना जिल्हाप्रमुख गुलाम सिद्दीकी, चंद्रपूर महानगर प्रमुख भरत गुप्ता, प्रतिमा ठाकूर तसेच वरोराचे माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली व नकुल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

या भव्य दहीहंडी महोत्सवाच्या यशस्वी आयोजनात शिवसेना वरोरा-भद्रावती येथील सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी व शिवसैनिकांन यांनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये