ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- तालुक्यातील हिरापूर खडकी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी पराक्रम, प्रशासन आणि प्रजाहितवादी कार्याची सांगड घालून आदर्श शासक म्हणून लौकिक प्राप्त केला. त्यांनी केलेले न्यायिक व सामाजिक कार्य आजही प्रेरणादायी आहे असे मान्यवरांनी मार्गदर्शनात सांगितले.
याप्रसंगी तिरुपती पोले, गजानन पोले, तुलसीदास बिडगीर, रामेश्वर पोले, राम बिडगीर, शेशराव सुरणर, बालाजी कोळेकर, कृष्णा सुरणर, महादेव पोले, गणेश पोले, शिवाजी देवकते, प्रवीण सलगर, गणेश कोळेकर मसना देवकते यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.