ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बल्लारपूर शहरातील बसस्टँड, रेल्वे चौक, साईबाबा मंदिर चौकात गतिरोधक बसवा, उलगुलान संघटनेचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

कॉलरी गेटला हायमास्टची आवश्यकता - राजु झोडे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

बल्लारपूर शहरातील नवीन बसस्टँड चौक, रेल्वे चूक व साईबाबा मंदिर गेट परिसर हा अत्यंत वर्दळीचा चौक समजल्या जाते. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात दुचाकी व चारचाकी वाहनांची वर्दळ रहात असून गतिरोधक नसल्यांने दररोज छोटे मोठे अपघात घडत आहे. तर शहरातील नवीन बसस्टँड मार्गावरून दररोज जड वाहनांची वर्दळ राहत असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळं या सर्व चौकात गतिरोधक बसविण्यात यावे अशी मागणी उलगुलान संघटनेच्या वतीनं करण्यात आली असून तसे निवेदन बल्लारपूर येथील मुख्याधिकाऱयांना देण्यात आले आहे.

बल्लारपूर शहर हे अत्यंत गजबलेलं शहर असून जिल्हा व राज्य मार्गावरून वाहतूक दिवस रात्र सुरु असते. येथे बायपास मार्गाची गरज असून याकडे मात्र स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. इतकेच नव्हे तर अनेक ठिकाणी हायमास्ट लाईट सुद्धा बंद असल्याने पायदळ जाणारे नागरिक व वाहन धारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच कॉलरी फाटा परिसरात हायमास्ट लाईट लावावे अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे, श्यामभाऊ झिलपे, दानि आराक, मंगेश बावणे,अमित सोनकर, कौशिक डोगरे,राजकरण केशकर,अभिनव तिवारी, दिनेश सुर्यवंशी,विनोद सातराज, ठप्पा निषाद, सोनू आमटे आदि लोक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये