ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावती येथे जिल्हास्तरीय शासकीय – अ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या क्रीडा स्पर्धेचे आयोजन

जिल्ह्यातील 42 संघांचा सहभाग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे

                 भद्रावती येथील प्रियदर्शनी खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने दिनांक 12 रोज सोमवारला प्रशिक्षण संस्थेच्या मैदानावर जिल्हास्तरीय शासकीय तथा अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या दोन दिवसीय क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या क्रीडा स्पर्धेत क्रिकेट, व्हॉलीबॉल तथा कबड्डी खेळांचा समावेश असून या स्पर्धेत जिल्ह्यातील शासकीय तथा अ-शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे 42 संघ सहभागी झाले आहेत.

सदर क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी यरमे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रियदर्शनी खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे संचालक तथा इंटक नेते धनंजय गुंडावार, प्राध्यापक डॉक्टर यशवंत घुमे, प्रफुल चटकी आदी मान्यवर उपस्थित होते.

आजच्या काळात सर्वसाधारण आर्थिक परिस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण हे महत्त्वाचे ठरत असून या अभ्यासक्रमातून त्यांना हमखास रोजगार उपलब्ध होत असतो असे मत धनंजय गुंडावर यांनी व्यक्त केले व विद्यार्थ्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी मैदानी खेळ खेळणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी अन्य मान्यवरांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. उद्घाटनपर कार्यक्रमाला प्रशिक्षण संस्थेचे शिक्षक वृंद, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये