स्वतंत्रदिवस हा सर्व भारतीयांसाठी आनंदाचा : दिनेश चोखारे
स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दिनेश दादापाटील चोखारे यांच्या हस्ते ध्वजारोहण

चांदा ब्लास्ट
आजचा दिवस असा आहे जेव्हा आपण स्वातंत्र्यलढ्यातील आपल्या विजयाचा अभिमान बाळगतो आणि तो साजरा करतो. हा दिवस सर्व भारतीयांसाठी आनंदाचा आहे, मग ते जगाच्या कोणत्याही भागात राहात असले असे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दिनेश दादापाटील चोखारे म्हणाले.
स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा ताडाळी येथे आज सकाळी राष्ट्रध्वजाचे विधीपूर्वक ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, दिनेश दादापाटील चोखारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बँकेचे शाखा व्यवस्थापक सुरेश निखाडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करण्यात आले. कार्यक्रमात स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून देशसेवेचा संकल्प घेण्यात आला.
यावेळी पुढे बोलताना दिनेश चोखारे म्हणाले की, आज पुन्हा एकदा आनंदाचा आणि आनंदाचा दिवस आहे जेव्हा आपण सर्वजण आपल्या स्वातंत्र्याचा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी एकत्र येतो. या पवित्र प्रसंगी, मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. अठ्ठ्यातर वर्षांपूर्वी, पंडित जवाहरलाल नेहरूंनी या ऐतिहासिक ठिकाणावरून पहिल्यांदाच हा गौरवशाली तिरंगा फडकवला होता, अशा प्रकारे कोट्यावधी भारतीयांचे परकीय राजवटीपासून स्वतंत्र होण्याचे शतकानुशतके जुने स्वप्न पूर्ण केले होते.आपण या क्षणाचा फायदा घेतला पाहिजे आणि ही संधी साधली पाहिजे. आपल्या देशाला समृद्ध करण्याचा दृढनिश्चय आपल्याला करायला हवा. आपण कोणापेक्षाही मागे नाही, भारतीयही सर्वोत्तम आहेत हे समजून घेण्यासाठी आपल्याला आत्मविश्वास असला पाहिजे. आपल्या राजकीय व्यवस्थेने आणि नेतृत्वाने विवेक, शहाणपण आणि दूरदृष्टी दाखवली पाहिजे जेणेकरून आपण या क्षणाचा सर्वोत्तम फायदा घेऊ शकू आणि भारताला खरोखरच एक महान राष्ट्र बनवू शकु असे ते म्हणाले.
यावेळी शाखा व्यवस्थापक सुरेश निखाडे यांनी आपल्या भाषणात प्रामाणिक व पारदर्शक बँकिंग सेवा देण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना अल्पोपहार देण्यात आला. देशभक्तीच्या गीतांनी वातावरण भारावून गेले आणि उपस्थितांमध्ये देशप्रेमाची नवी ऊर्जा निर्माण झाली.यावेळी रोशन तुरारे, प्रमोद गौरकार, गोविंद फाडके, विजय बिपटे, राहुल मालेकर, विलास जोगी, सचिन चटकी यांचेसह कर्मचारी तसेच ग्राहक मोठ्या उत्साहाने उपस्थित होते.