महाराष्ट्र

नीट परीक्षेतील नेत्रदिपक यश प्राप्त केल्याबद्दल श्रेयश निबूधे चा सत्कार

स्व.श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम

चांदा ब्लास्ट :अतुल कोल्हे भद्रावती :

तालुक्यातील सागरा येथील शेतकरी तथा सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष युवराज निबूधे यांचा मुलगा श्रेयस याने राष्ट्रीय पात्रता वैद्यकीय प्रवेश परीक्षा २०२३ नीट मध्ये नेत्रदिपक यश प्राप्त केले. श्रेयशला सातशे वीस पैकी सहाशे अंशी गुण मिळाले. या सुयशाची दखल घेत सर्वसामान्य जनतेच्या सेवेत सदैव तत्पर असलेल्या स्व.श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे उपक्रम डॉ.ए. पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी कल्याण योजनेअंतर्गत श्रेयश निबुधेचा नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी  श्रेयशचे वडील युवराज निबूधे व मयुर पिदुकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले आणि ट्रस्टच्या विश्वस्त जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुषमा शिंदे यांच्या शुभ हस्ते श्रेयश ला सत्कारा दाखल वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखीत ग्रामगीता ग्रंथ, थोर समाजसेवक बाबा आमटे यांचा फोटो आणि पुष्पगुच्छ देण्यात आले.

या प्रसंगी शिवसेना ( ठाकरे ) गटाचे तालुका प्रमुख तथा नगरसेवक नंदु पढाल, शहरप्रमुख घनश्याम आस्वले, महिला शहर संघटिका माया टेकाम, नामदेव आत्राम, युवा सेना उपजिल्हाधिकारी  शिव गुडमल, यांच्यासह जय हिंद फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष माजी सैनिक विजय तेलरांधे , प्रमुख सल्लागार कॅ. विलास देठे, सचिव संतोष आकेवार, प्रमोद रामटेके, रामचंद्र नवराते,नमोद रामटेके, दिलीप लेडांगे, प्रमोद गावंडे आणि अर्चना कोडापे प्रामुख्याने उपस्थित होत्या. सर्वांनी श्रेयश चे कौतुक करून त्याला पुढील शैक्षणिक प्रगती करण्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये