ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चांदा पब्लिक स्कूल राष्ट्रीय पातळीवर दुहेरी सन्मानाने सन्मानीत

चांदा ब्लास्ट

चांदा पब्लिक स्कूल ने राष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध करत इंडिया एलिट अवॉर्डस् आणि इंस्टिट्युशनल एक्सलन्स अवॉर्ड मध्ये आपल्या शिरपेचात दुहेरी मानाचा तुरा रोवला. एक्सलन्स इन एज्युकेशनल स्टॅर्ड्स आणि अॅडॅप्टीबिलीटी अॅन्ड इम्प्लिमेंटेशन या दोन श्रेणीमध्ये शाळेने देशात ‘आउटस्टॅन्डींग स्कूल ऑफ द इअर’ हा पुरस्कार प्राप्त केला आहे.

हा पुरस्कार समारंभ दि. 1 ऑगस्ट 2025 रोजी ‘द ताज, वेस्ट एन्ड, बँगलोर’ येथे पार पडला. देशभरातील नामांकित शाळा, महाविद्यालये व शैक्षणीक संस्था तसेच नामवंत व्यक्तींना त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजीक योगदानासाठी यावेळी गौरविण्यात आले. समारंभाला अनेक उद्योगपती, नेते आणि राजकीय क्षेत्रांशी संबंधीत मान्यवर देखील उपस्थित होते.

शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जीवतोडे यांनी या यशाबद्दल कौतुक करत सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांचे अभिनंदन केले. प्राप्त केलेले हे यश आम्हाला आमची ध्येय गाठण्यास आणखीनच प्रेरणा देते, असेही त्या म्हणाल्या.

मुख्याध्यापिका सौ. आम्रपाली पडोळे यांनी शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे परिश्रम आणि पालकांचा पाठिंबा यांचे कौतुक केले व म्हणाल्या ‘जेव्हा आवड, जिद्द आणि चिकाटी एकत्र येतात तेव्हा यश मिळाल्यावाचून राहत नाही.

शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणपद्धती, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासावरचा भर आणि नाविण्यपूर्ण कार्यपद्धती यामुळेच हा राष्ट्रीय सन्मान शाळेने प्राप्त केला आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये