‘सरसेनापती अॅड. मोरेश्वरराव टेमुर्डे’ पुस्तकाचे लेखक प्रा. डॉ. यशवंत घुमे यांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
महाराष्ट्र विधानसभेचे माजी उपसभापती व विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट) भद्रावतीचे माजी अध्यक्ष सरसेनापती अॅड. मोरेश्वरराव टेमुर्डे यांच्या ८३ व्या जयंतीनिमित्त शहरातील श्री मंगल कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात ‘सरसेनापती अॅड. मोरेश्वरराव टेमुर्डे’ या पुस्तकाचे लेखक प्रा. डॉ. यशवंत घुमे यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
प्रा. डॉ. यशवंत घुमे हे विवेकानंद महाविद्यालय, भद्रावती येथील मराठी विभाग प्रमुख तसेच गोंडवाना विद्यापीठातील वाणिज्य भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य आहेत. त्यांनी आनंदवनचे संस्थापक व थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या जीवनकार्यावर पीएचडी प्राप्त केली असून, गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रातही कार्यरत आहेत.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोग, मुंबईचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी भूषविले. स्वागताध्यक्ष म्हणून विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट) वरोरा चे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान होते. प्रमुख अतिथी म्हणून मायाबाई टेमुर्डे, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, भाजपाचे रमेश राजुरकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट) वरोराचे उपाध्यक्ष जयंत टेमुर्डे, सचिव अमन टेमुर्डे, सहसचिव राजेंद्र गावंडे, कोषाध्यक्ष अभिजीत बोथले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. माया राजुरकर, डॉ. विजय गावंडे, डॉ. शैलेश महाजन, शांता बोथले, प्राचार्य एन. जी. उमाटे, उपप्राचार्य डॉ. सुधीर आस्टुनकर, संचालक श्यामराव लांबट, ईजाज अशरफ आदींची उपस्थिती लक्षणीय होती.