देऊळगावराजा तहसील कार्यालयातील आधार सेतू केंद्र गायब?

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा तहसील कार्यालयातील आधार सेतू केंद्र मागील तीन ते चार वर्षापासून गायब झाले असून सेतू केंद्र नागरिकांसाठी तात्काळ सुरू करण्यात यावे अशी मागणी जय शिवसंग्राम संघटनेचे वतीने दि.12 ऑगस्ट रोजी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. देऊळगाव राजा तहसील कार्यालय अंतर्गत ग्रामीण भागातून दररोज दैनंदिन शासकीय कामासाठी हजारो वयोवृद्ध नागरिक व शाळकरी मुले दिव्यांग व्यक्ती तहसील कार्यालयात दररोज येत असतात,परंतु इथे आधार सेतू केंद्र दिसत नसल्यामुळे त्यांचा हिरमोड होत असल्याने.
तहसील कार्यालयाने नेमून दिलेले आधार सेतू केंद्र त्वरित पूर्णवत सुरू करण्यात यावे. जेणेकरून ग्रामीण भागातील येणाऱ्या नागरिकांची हेडसाळ होणार नाही. अशी सुज्ञान नागरिक दबक्या आवाजात येथील आधार सेतू केंद्र गायब झाल्याची चर्चा करीत आहेत त्याचीही ओरड थांबेल. काही आधार सेतू संचालक हे संबंधित सेतू केंद्र तहसील कार्यालय मध्ये न चालवता इतर ठिकाणी चालवत आहे. तरी तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी हे आधार सेतू संचालकाला पाठीशी घालत आहे.
कोणतीच कारवाई आधार सेतू संचालकावर तीन ते चार वर्षात केलेली नाही. देऊळगाव राजा तहसील कार्यालयातील गायब झालेले आधार सेतू केंद्र हे अधिकारी व कर्मचारी यांच्या संगमताने इतर ठिकाणी तीन ते चार वर्षापासून सुरू आहे. वयोवृद्ध, श्रावण बाळ, संजय गांधी, शाळकरी मुले, अपंग व्यक्ती, आपल्या आधार संबंधित कामे करण्यासाठी तहसीलच्या बाहेर जावे लागत आहे. सेतु संचालकाच्या मनमानीमुळे आधार सेंटरला जास्त पैसे द्यावे लागतात. याकरिता नागरिकांसाठी आधार सेतू हे तात्काळ देऊळगाव राजा तहसील कार्यालय मध्ये सुरू करण्यात यावे.
तीन ते चार वर्षापासून देऊळगाव राजा तहसील कार्यालय मध्ये आधार सेतू केंद्र चालू नाही. तीन ते चार वर्षांमध्ये नागरिकांना आधार सेतूचा लाभ न मिळाल्याने नागरिकांची हेडसाळ होत आहे. त्वरित तहसील कार्यालय मध्ये. वयोवृद्ध नागरिकांसाठी व शाळकरी मुलांसाठी अपंग व्यक्तीं साठी तात्काळ आधार सेतू केंद्र चालू करावे अन्यथा जय शिवसंग्राम संघटनेच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदनावर तालुकाध्यक्ष जहीरखान, शहराध्यक्ष अजमत खान, युवक शहराध्यक्ष शंकर वाघमारे, मुबारक चाऊस,अनिस शाह, राजेश भाग्यवंत, राजू गव्हाणे, संतोष हिवाळे, शेख इम्रान, असलम खान, किशोर वाघ, शेख अहमद, आदीच्या स्वाक्षरी आहेत.