ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रसंत साहित्यावर जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

श्रीगुरुदेव सेवाश्रम नागपूर अंतर्गत राष्ट्रसंत साहित्य अभ्यास मंडळ द्वारा आयोजित आणि राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या सहकार्याने गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही येत्या २१ आॅगष्ट २०२४ रोजी चंद्रपूर जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा निःशुल्क आहे.

इयत्ता ७ ते १२ च्या विद्यार्थ्यांसाठी निबंधाचे पुढील विषय दिलेले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्यातील ग्रामनाथ , राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील सणोत्सव यापैकी एका विषयांवर संबंधित विद्यार्थ्यांनी पंधराशे शब्दांचा निबंध प्रत्यक्ष केंद्रावर येऊन लिहायचा आहे . सदर निबंध स्पर्धा बल्लारपूर, राजुरा, चंद्रपूर, सिंदेवाही,मुल, सावली, भद्रावती येथे निश्चित केलेल्या केंद्रावर दि.१८/०८/२०२४ (रविवारी) रोजी होणार आहे.

सहभागी सर्व स्पर्धकांना आकर्षक प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. उत्तम निबंध लिहिणाऱ्यां स्पर्धकांतून खालील प्रमाणे विजेते निवडले जाणार आहे.

प्रथम पारितोषिक रु.२०००,

द्वितीय पारितोषिक रु. १५००,

प्रोत्साहन पारितोषिक रू. १००० चे ४ देण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन

राष्ट्रसंत साहित्य अभ्यास मंडळ

चे अध्यक्ष डॉ. बाळ पदवाड , श्री गुरुदेव सेवाश्रमाचे सचिव विठ्ठलराव पुनसे यांनी केले आहे. आयोजन संदर्भात जिल्हास्तरीय समन्वय समितीमध्ये प्रा. नामदेव मोरे घुग्घुस ,एड. राजेंद्र जेनेकर राजुरा ,

डॉ. श्रावण बानासुरे बल्लारपूर ,डॉ. धर्मा गावंडे सावली,श्री.नामदेव पिज्दूरकर मुल,श्री.अभय घटे,

श्री. बंडू टेकाम,श्री. कार्तिक चरडे,

श्री. देवराव कोंडेकर, चंद्रपूर

श्रीमती रोहिणी मंगरूळकर,

कु. रिया पिपरीकर , प्रा. मालेकर आदींचा समावेश करण्यात आला आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये