ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दूषित पाणी पुरवठ्यामुळे ग्रामस्थांना अतिसाराची लागण : ग्राम पंचायतचे दुर्लक्ष

रुग्णांवर उपचारः डॉक्टरांसह आरोग्य सेवकांचे पथक तैनात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रह्मपुरी तालुक्यातील हळदा येथे दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना अतिसाराची लागण लागली असून येथील नागरिकांना मळमळ करणे, उलट्या व हगवण सुरू झाले आहे.

हळदा येथे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी टाकी मागील अनेक दिवसापासून स्वच्छ केली नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

मागील सात दिवसापासून हळदा प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांवर उपचार करण्यात आले. परंतु रुग्णांची संख्या वाढत असल्याने शेवटी दि. ४ ऑगस्टला हळदा प्राथमिक आरोग्य केंद्रात येथील आरोग्य विभागाने शिबिर लावून तिथेच रुग्णांवर उपचार सुरू केले. गावकऱ्यांसह आरोग्य विभागानेही त्यांना पाण्याची टाकी त्वरीत स्वच्छ करा, अशी मागणी केली.

परंतु ग्राम पंचायतने कोणतीही कारवाई केली नाही. याचा परिणाम हळदा येथे दूषित पाणीपुरवठा होत असल्याने येथील जवळपास ८१ नागरिकांना अतिसाराची लागण झाली आहे .

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये