शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील गरीब गरजु लोकांना मिळणे आवश्यक _ आमदार मनोज कायंदे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील गरीब गरजु लोकांना मिळणे आवश्यक असल्याचे मत आमदार मनोज कायंदे यांनी महसूल सप्ताह च्या समारोप कार्यक्रमात व्यक्त केले
देऊळगाव राजा महसूल विभागाच्या वतीने श्री व्यंकटेश महाविद्यालय येथे सप्ताह समारोप प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजन केले होते सदर कार्यक्रमात आमदार मनोज कायंदे यांच्या हस्ते गेल्या कित्येक वर्षापासून शासकीय लाभापासून वंचित राहणाऱ्या भटक्या विमुक्त प्रवर्गातील व्यक्तींना विविध प्रमाणपत्र सह महत्त्वाचे म्हणजे जातीचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले,पिढ्यानपिढ्या देऊळगाव राजा येथे वास्तव्यास असणारे विमुक्त भटक्या जाती जमाती प्रवर्गातील कुटुंबप्रमुखांना कसल्याही प्रकारचे प्रमाणपत्र नव्हते यासंदर्भात आमदार मनोज कायंदे यांनी काही दिवसापूर्वी महसूल विभागांना आदेश देऊन सदर प्रवर्गातील कुटुंब प्रमुखांची तसेच इतर माहिती संकलित करून जातीचे प्रमाणपत्र द्यावे असे आदेशित केले होते. त्यानुसार महसूल विभागाने सदरची कार्यवाही केली. आणि एकूण 45 जातीच्या प्रमाणपत्राचे सदर प्रवर्गाच्या कुटुंबप्रमुखांना देण्यात आले, आमदार मनोज कायंदे यांनी देऊळगाव राजा येथील महसूल विभागाच्या कामा संदर्भात समाधान व्यक्त केले या पद्धतीने सप्ताह दरम्यान तुम्ही मंडळनिहाय कार्यक्रम ठेवता त्याच पद्धतीने महिन्यातून एखाद्या वेळेस सर्कल निहाय सदर कार्यक्रमाचे आयोजन करून आवश्यक असणारे दाखले त्यांना मंडळनिहाय भेटल्यास ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेचे दाखल्यासाठी माराव्या लागणाऱ्या चकरातून मुक्त होतील असे विधान कायंदे यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विभागाचे आमदार मनोज कायंदे. तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, नायब तहसीलदार श्रीमती सायली जाधव,डॉ. संतोष मुंडे, प्राचार्य डॉ. गोरे, भटक्या जाती चे नेते गजानन शेन्नुरे,पत्रकार संघ चे अध्यक्ष गजानन तिडके, व सुषमा राऊत,बालाजी कौशल्य,महसूल सहाय्यक, रामदास मांटे मंडळ अधिकारी, राजू तागवाले महसूल अधिकारी, पंढरीनाथ जायभाये ग्राम महसूल अधिकारी, शिवानंद आंधळे, उमेश गरकळ, प्रशांत वाघ, पूजा साळवे, रुपेश सोनवाल. सह हाजी महम्मद सिद्दिकी,प्रदीप वाघ, सदाशिव मुंडे, शुभम कायंदे यांच्यासह लाभार्थी तसेच इतर नागरिकांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे संचालन प्रा जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन रामदास मान्टे यांनी केले