सीआरपीएफ जवान अमोल खार्डे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा तालुक्यातील आळंद गावचे सुपुत्र, सीआरपीएफ जवान अमोल खार्डे यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात शनिवार, दि. ९ ऑगस्ट रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अमोल खार्डे दोन वर्षांपूर्वी सीआरपीएफमध्ये भरती झाले होते आणि सध्या उत्तर प्रदेशातील आमटी येथे कार्यरत होते. ७ ऑगस्ट रोजी त्यांच्या मृत्यूची माहिती गावात पोहोंचली. शनिवारी सकाळी त्यांचे पार्थिव देऊळगाव राजा
येथे आणल्यानंतर मोटारसायकल ‘रॅली काढून त्यांना मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी पोलिस निरीक्षक ब्रह्म गिरी आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. तसेच सीआरपीएफचे जवानही सशस्त्र मानवंदना देण्यासाठी उपस्थित होते. वडिलांनी मुलाच्या चितेवर अग्नीदान केला; तो कुटुंबाचा एकुलता एक होता. यावेळी आमदार मनोज कायंदे यांनी पुष्पचक्र अर्पणं करून श्रद्धांजली वाहिली. तसेच उद्धवसेनेचे तालुकाप्रमुख दादाराव खार्डे, डॉ. सुनील कायंदे, गजानन काकड़, प्रकाश गीते, सदाशिव मुंडे, गजानन पवार आणि सुदाम काकड यांनीही श्रद्धांजली अर्पण केली.