महसूल दिनानिमित्त महसूल सेवक सुरज शेंडे सन्मानित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
महसूल दिनाचे औचित्य साधून सज्जा चोरा येथील महसूल सेवक सुरज शेंडे यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री करण देवतळे यांचे हस्ते तहसील कार्यालयामार्फत सन्मान करण्यात आला.
तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या हस्ते पुष्प्गुगुच्छ, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. कोतवाल म्हणून नियुक्ती झाल्यापासून चोरा येथील महसूल सेवक (कोतवाल)सुरज शेंडे यांनी प्रामाणिकपणे व निष्ठेने आपली जबाबदारी पार पडली आहे. गावपातळीवरील शासकीय योजना राबविणे, विविध निवडणुकांचे कामकाज, आपत्ती व्यवस्थापन तसेच महसूल प्रकरणांमध्ये प्रशासनाला आवश्यक माहिती वेळोवेळी पुरविणे अशा विविध कार्यात त्यांचा मोलाचा सहभाग राहिला आहे.
या कार्यक्रमास नायब तहसीलदार मधुकर काळे,सुधीर खांडरे, मनोज आकनूरवार, मंडळ अधिकारी तसेच तहसिल कार्यालयातील अधिकारी सर्व तलाठी व कर्मचारी उपस्थित होते. महसूल दिनी झलेला हा सन्मान सर्व महसूल सेवकांसाठी प्रेरणादायी ठरला.