ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिवतीत महसूल सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- तहसील कार्यालय जिवती येथे महसूल सप्ताह निमित्त (दि.४) सोमवारी तहसील कार्यालय जिवती मार्फत जिवती, पाटण, टेकमांडवा मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान पार पडले. आमदार देवराव भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत विदर्भ महाविद्यालय जिवती येथे पार पडलेल्या कार्यक्रमात आमदार देवराव भोंगळे व तहसीलदार रूपालि मोगरकर यांचा हस्ते लाभार्थ्यांना सहा नविन शिधापत्रिका, तीन अंत्योदय शिधापत्रिका, पाच प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका, दहा समर्पित प्रमाणपत्र, वीस सेतू दाखले यासह विविध विभागातील विविध योजनांतील पात्र लाभार्थ्यांना शासकीय लाभासह प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

तसेच आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे वारस अनिता भीमराव आत्राम भुरीयेसापूर, इंदुबाई राजकुमार पवार शेणगाव यांना प्रत्येकी एक लाख प्रमाणे अनुदान मंजूर करून लाभ देण्यात आला. सोबतच नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यात आले. विविध योजनांविषयी माहितीही देण्यात आली. हे अभियान यशस्वी करण्यासाठी नायब तहसीलदार, निरीक्षण अधिकारी, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी यांचेसह तहसील कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले. याप्रसंगी सर्व विभागाचे अधिकारी, महेश देवकते, दत्ता राठोड व इतर सर्व कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

    तसेच (दि.५) रोजी विशेष सहाय्य अनुदान योजनेच्या डिबिटी न झालेल्या लाभार्थीना गृहभेटी देऊन डिबिटी करण्यात आले. तसेच ज्यांचे आधार प्रामाणिकरण झालेले नाही ते करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. तहसील कार्यालय जिवती येथे १ ऑगस्टला महसूल दिन व महसूल सप्ताह २०२५ चा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. (दि.३) रविवारी जिवती, पाटण, टेकामांडवा मंडळात पांदण रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये