ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिवतीच्या नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदी गोगपाचे जमालुद्दीन शेख

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- नगरपंचायतीच्या बहुप्रतिक्षित उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक नगरपंचायतीच्या सभागृहात पार पडली.

मागील काही दिवसांपूर्वी जिवती नगरपंचायतीत बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या काही नगरसेवकांनी भाजप मध्ये प्रवेश केल्याने नगरपंचातीमधील आघाडीची सत्ता ही अल्प मतात होतीत. पूर्वी पासूनच नगरपंचायतीची निवडणूक युतीत लढलेल्या भाजप आणि गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या नगरसेवकांनी तत्कालीन नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव पारित करून युतीची सत्ता स्थापन केली.

भाजपच्या अनुसया राठोड यांची नगराध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. तर उपनगराध्यक्ष पदी गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जमालुद्दिन शेख यांची बिनविरोध निवड झाली आहे. जमालुद्दिन शेख जिवतीतील मोठं प्रस्थ असलेले गोंडवाना शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा गो. ग. पा. नेते गजानन पाटील जुमनाके यांचे निकटवर्तीय समजलेले जातात, स्व. गोदरू पाटील जुमनाके यांनी काँग्रेस ची साथ सोडत गोंडवाना गणतंत्र पार्टीत प्रवेश केला तेव्हा जमालुद्दिन शेख यांनीही स्व. जुमनाके यांना साथ देत गो. ग. पा. मध्ये प्रवेश केला होता.

जमालुद्दिन शेख यांची प्रशासनावर उत्तम पकड आहे, ते पहिल्यांदाच नगरसेवक झाले होते. त्यांची कामाची पद्धत फार वेगळी आहे, बोलण्याची लकब वकृत्व कौशल्य या सगळ्या गोष्टी विकासात्मक कामे करण्यासाठी उपयोगी येणार आहे त्यामुळे जिवती नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदी त्यांची बिनविरोध निवड झाल्याची प्रतिक्रिया गो. ग. पा. नेते गजानन पाटील जुमनाके यांनी दिली.

जमालुद्दिन शेख यांची जिवती नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल गोंडवाना शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा गो. ग. पा. नेते गजानन पाटील जुमनाके, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक पांडुरंग जाधव, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिवती तालुकाध्यक्ष हनुमंत कुमरे, नगरसेवक ममताजी जाधव, कृष्णा सिडाम, सतलुबाई जुमनाके, लक्ष्मीबाई जुमनाके, ज्येष्ठ नेते भीमराव पाटील जुमनाके यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये