ताज्या घडामोडी

आ. सुभाषभाऊ धोटेंच्या रूपाने क्षेत्र विकासाची मोठी संधी ; त्यांना बहुमताने विजयी करा : दानसारी सिधक्का

तेलंगणाच्या मंत्री दानसारी सिधक्का यांची आ. सुभाष धोटेंच्या प्रचारार्थ भव्य रॅली व जाहीर सभा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर येथे महाविकास आघाडी समर्थित भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या प्रचारार्थ भव्य रॅली व जाहीर सभा हजारो नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली. यावेळी तेलंगणाचे कॅबिनेट मंत्री दानसारी सिधक्का यांनी सांगितले की, परवा तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी राजुरा मध्ये घोषणा केली आहे की, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताच आ. सुभाषभाऊ धोटे यांना राज्य सरकारमध्ये मोठी जबाबदारी मिळावी यासाठी दिल्ली हायकमांडकडे शब्द खर्च करण्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे आ. सुभाषभाऊ धोटे यांच्या रूपाने राजुरा विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाची मोठी संधी आहे. तेव्हा त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन तेलंगणाचे कॅबिनेट मंत्री दानसारी सिधक्का यांनी सांगितले. तर मंत्री पोनम प्रभाकर यांनी सुध्दा तेलंगणा सरकारने राज्यात ५ गॅरंटी पुर्णपणे लागू केल्या आहेत. येथे महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर नक्की ५ गॅरंटी लागू होणार आहेत त्यामुळे आ. सुभाषभाऊ धोटे यांनाच पुन्हा विजयी करा असे आवाहन केले. तर आ. सुभाषभाऊ धोटे यांनी ही आपली विधानसभेची शेवटी निवडणूक असून सर्वांगीण विकासासाठी पून्हा एकदा प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन केले.

          यावेळी काँग्रेसचे निरीक्षक अनुप फिलीप, राष्ट्रवादी (श. प) चे अरुणभाऊ निमजे, शिवसेना (उभाठा) चे सागर ठाकुरवार, काँग्रेसचे नेते विठ्ठलराव थिपे, स्वामी येरोलवार, विजयराव बावणे, नामदेवराव येरणे, नगराध्यक्षा सविता टेकाम, आशाताई खासरे, सतीश बेतावर, पापय्या पोन्नमवार, सचिन भोयर, रौफ खान वजीर खान, श्यामराव कोटणाके, माधुरी टेकाम, प्रा. आशिष देरकर, शैलेश लोखंडे यासह हजारोंच्या संख्येने काँग्रेस, राष्ट्रवादी (श. प), शिवसेना (उभाठा), महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये