ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गडचांदूर बसस्थानकासाठी थुट्रा येथील जागा मंजूर करा

आमदार सुभाष धोटेंची महसूलमंत्री विखे पाटील यांच्याकडे मागणी.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

मौजा थुटरा, ता.राजुरा येथील सर्व्हे नं 264/1 आराजी 5.13 हे.आर. पैकी 1.20 हे.आर. जागा गडचांदूर येथे बसस्थानक करिता मंजूर करण्याच्या मांगणीचे पत्र राजुरा विधानसभेचे आमदार श्री.सुभाष धोटे यांनी राज्याचे महसूलमंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांना विधानभवन कार्यालय (मुंबई) येथे सुपूर्द केले. सदरहू पत्र महसुल व वने विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांना “प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करावा”, याआमदार सुभाष धोटेंची महसूलमंत्री विखे पाटील यांच्याकडे मागणी. रिमार्कसह अग्रेसारीत करण्यात आले आहे.

याबाबत अधिकची माहिती अशी की गडचांदूर हे कोरपना व जिवती तालुक्यातील बाजारपेठेचे मध्यवर्ती ठिकाण आहे. शहराची लोकसंख्या जवळपास 40 हजाराच्या आसपास असून परिसरात 4 सिमेंट कारखाने अस्तित्वात आहेत, त्यामुळे मोठया प्रमाणावर लोकांची वर्दळ असते. सदरहू ठिकाणी बस स्थानक नसल्याने शालेय विद्यार्थी, आबालवृद्ध व सर्वसामान्य नागरिक यांची मोठी गैरसोय होत आहे. अशी माहिती आमदार श्री.सुभाष धोटे यांनी दिली आहे.

गडचांदूर येथे बसस्थानक बांधकामास जागा मंजुरी बाबतचा प्रस्ताव जिल्हा अधिकारी, चंद्रपूर यांनी अवर सचिव, महसुल व वन विभाग यांचेकडे सन १३ ऑगस्ट २०१९ व २५ ॲक्टोबर २०२१ रोजी सादर केला आहे. यावर लवकरच निर्णय होईल, अशी अपेक्षा आमदार महोदयांनी व्यक्त केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये