ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सनराईज योगा ग्रुप तर्फे उपरवाही येथे महिलांसाठी योग शिबिर संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
सनराईज योगा अँक्टिव्हिटी बेनिफिट वूमन्स ग्रुप गडचांदूर आणि अंबुजा सिमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उपरवाही येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या प्रांगणात महिलांसाठी योग शिबिर घेण्यात आले, सनराइज योगा ग्रुप च्या संयोजिका कुंतल चव्हाण, वैशाली पारधी, अंजू बिस्वास , पल्लवी इंगोले, भारती राठोड, यांनी महिलांना योग प्रशिक्षण दिले.
महिलांनी योग शिबिराला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला, गावातील 50 महिलांनी सहभाग घेतला, सुदृढ आरोग्य राहण्यासाठी बी पी, शुगर पासून अलिप्त राहण्यासाठी योगा नियमितपणे दररोज करणे आवश्यक आहे असे कुंतल चव्हाण यांनी महिलांना सांगितले, महिलांनी दररोज सकाळी योगा करण्याचा निर्णय घेतला आहे.