केंद्रशासित प्रदेश सिल्वासा मध्ये बीजेएसची नवीन शाखा सुरू
BJS च्या सुरू असलेल्या सामाजिक कार्याची माहिती सकल जैन समाजामध्ये शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणार नंदकुमार साखला राष्ट्रीय अध्यक्ष

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
केंद्रशासित प्रदेश असलेल्या सिल्वासा या शहरात बीजेएसने आपली पाळे मुळे घट्ट रोवली असून नुकतीच तेथील सकल जैन समाजाच्या सभेत सिलवासा चाप्टरची घोषणा करून नवीन कार्यकारणी चा शपथविधी मोठ्या उत्साहात व बीजे एस चे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार साखला व राष्ट्रीय सचिव दीपक चोपडा यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी संपूर्ण भारतभर बीजीएस चे जे सामाजिक कार्य सुरू आहे त्याची सखोल माहिती नंदकुमार साखला यांनी दिली व संपूर्ण भारतात ज्या ज्या ठिकाणी सकल जैन समाज वास्तव्यास आहे त्या त्या ठिकाणी बीजेएस करत असलेल्या कार्याची माहिती व्हावी यासाठी प्रत्येक ठिकाणी चाप्टरच्या माध्यमातून BJS ची ताकद वाढवण्याकडे फोकस करण्यात आला असल्याचे यावेळी सांगण्यात आले यावेळी बीजेएस या सिलवासा शहर चाप्टरच्या अध्यक्षपदी डॉक्टर राकेश जैन तर सचिव पदी रमेश धोका यांची सकल जैन समाजाच्या सहमतीने निवड करण्यात आली,
याबाबत सविस्तर असे की देशात गेल्या 40 वर्षापासून भारतीय जैन संघटना ही सर्व दूर समाज उपयोगी कार्यक्रम घेत आहे सकल जैन समाजाचे सहकार्याने समाज अधिक मजबूत होण्यासाठी सर्वच प्रयत्न करत आहेत.
बीजेएस चे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा, राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार साखाला, राष्ट्रीय सचिव दीपक चोपडा व 16 राज्यातील BJS चे राज्याचे प्रमुख हे तळागाळापर्यंत बीजेएसचे सुरू असलेल्या कामाची माहिती पोहोचवण्याचे काम करीत आहे पुण्यातील वाघोली स्थित असलेल्या भारतीय जैन संघटनेच्या वतीने राज्यातील व परराज्यातील जवळपास 3000 निराधार मुला मुलींना दत्तक घेऊन त्यांचा बारावीपर्यंतचा सर्व खर्च उचलला असून यामध्ये भूकंपामध्ये बेघर झालेली मुले शेतकरी आत्महत्या मुळे निराधार झालेली मुले मुली यांचा समावेश आहे सोबतच युवती सक्षमीकरण पाणी आडवा पाणी जिरवा विधवा विधूर अपंग यांच्यासाठी पुनर्विवाहासाठी महत्त्वाची भूमिका समाजातील उच्चशिक्षित मुले व मुली यांचे साठी विवाह करण्यासाठी कौन्सिलिंग करणे मूल्यवर्धन शिक्षण बाबत जनजागृती करणे असे अनेक समाज उपयोगी कार्य बीजेएस ने अखंडपणे सुरू ठेवली असल्याचे यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार साखला यांनी सांगितले यावेळी सिलवासा चाप्टर ची घोषणा करून पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा आनंदात पार पडला राष्ट्रीय सचिव दीपक चोपडा यांनी सुद्धा बीजेएस समाजासाठी काय करत आहे याची सविस्तर माहिती दिली.
याप्रसंगी नवनियुक्त अध्यक्ष डॉक्टर राकेश जैन सचिव रमेश धोका सकल जैन समाजातील सौ. प्रियंका विकास कान्हेेड (जैन) डॉक्टर मीना सुरेश जैन, डॉक्टर अर्चना जैन, प्राची जैन, ललित जैन, धीरज जैन, रायचंद शाह, हितेश भाई कोठारी उपस्थित होते.