ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रनाग मंदिरात नागपंचमी यात्रेला सुरुवात

हजारो भाविकांनी घेतले श्री भद्रनाग स्वामींचे दर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

महाराष्ट्रातील एकमेव नऊ फन्याच्या नागाचे मंदिर

    चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील सुप्रसिद्ध तथा ऐतिहासिक भद्रनाग स्वामी मंदिरात विदर्भातील सर्वात मोठ्या नागपंचमी यात्रेला दिनांक 29 पासून सुरुवात झाली. या निमित्ताने हजारो भाविकांनी मंदिरात श्री भद्रनाग स्वामींचे दर्शन घेतले.

पहाटे श्री भद्रनाग स्वामींचा अभिषेक तथा आरती पार पडल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले असुन हे मंदिर विदर्भातील नाग पूजेची साक्ष देणारे एकमेव स्थळ आहे. सकाळपासूनच भाविकांनी श्री भद्रनाग स्वामींच्या दर्शनासाठी मंदिरात रीघ लावली. भाविकांना भद्रनाग स्वामींचे सहजतेने दर्शन घेता यावे यासाठी मंदिर प्रशास तथा पोलिस प्रशासनाने मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवून भाविकांना सुविधा उपलब्ध करून दिल्या.

नागपंचमी यात्रेनिमित्त विदर्भ, महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा तथा मध्यप्रदेशच्या कानाकोपऱ्यातून भाविक सदर मंदिरात दर्शनासाठी येत असतात. सदर देवस्थान अत्यंत जागृत असून ते नवसाला पावणारे असल्याची भाविकांमध्ये मान्यता असल्यामुळे मंदिरात वर्षभर भाविकांची वर्दळ असते. यानिमित्ताने मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आले असून मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मंदिर परिसरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी शहर तथा मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यात्रेला यशस्वी करण्यासाठी मंदिर प्रशासन, नगर परिषद प्रशासन तथा पोलीस प्रशासनाने सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये