अज्ञात ट्रकने तीन गायींना उडविले., एक ठार दोन जखमी नागरीकांच्या मदतीने दोन जणांवर उपचार
मोकाट जनावरांकडे न.प.चे दुर्लक्ष

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी :- शहरात मोकाट जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.मुख्य महामार्गावरील अगदी रस्त्याच्या मध्यभागी गाई, बैल ,कुत्रे हे जनावरे बसले असतात. त्यामुळे रहदारी करणाऱ्या नागरिकांना कमालीचा त्रास होत असते. बऱ्याच वेळा मोकाट जनावरामुळे अपघात झाले आहे.याबाबतीत अनेकदा नगर प्रशासनाला ही बाब लक्षात आणून देऊन वृत्तपत्रात बातम्या येऊन सुद्धा सुस्त असलेले नगरपरिषद प्रशासन कुठलीच कारवाईचे पाऊल उचलत नसल्याचे दिसते.
अशाच आज पहाटेच्या सुमारास ब्रम्हपुरी नागभीड रोड वर भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाने तीन जनावरांना धडक दिली त्यात एक गाय जागीच ठार झाली तर दोन जनावरे गंभीर जखमी झाल्यात सकाळच्या सुमारास मॉर्निंग वॉक साठी जाणाऱ्या नागरिकांस नागभीड रोड लावण्या वस्त्र भंडार समोर, हाय वे च्या बाजूला तीन गायी पडून दिसल्या. त्यांना सकाळी एका अज्ञात वाहनाने चिरडले असल्याचे दिसले राजू भागवत यांनी पोलीस स्टेशन, नगर परिषद, खाजगी वेटरनरी डॉक्टरांना फोन केले.
डाॅ ठोंबरे येऊन त्यांनी दोन जख्मी गायींवर उपचार केले .ताबडतोड तिथे पशु प्रेमी तुषार काटेखाये नाजूक बगमारे, संतू भांडारकर,अनिता भागवत,चंचल हलधर उपस्थित झाले यांनी सुध्दा त्या मुक्या जनावरांना वाचवण्यासाठी खूप मदत केली माणुसकीचे दर्शन दिले परत सकाळी आठ वाजता एक गाय बुरले पेट्रोल पंप समोरील सीडीसी बँक समोर जखमी अवस्थेत दिसली त्यावेळेशी नागरिकांनी उपचारासाठी धावपळ केली.
प्रशांत डांगे यांनी पशु वैद्यकीय अधिकारी पुरी यांना फोन करून बोलविले त्यांनी तात्काळ घटनास्थळी येत जखमी गाई वर उपचार केले ट्रॅफिक पोलिस राहुल लाखे यांनी घटनास्थळी येऊन नगर परिषदेची गाडी बोलावून पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.ब्रम्हपुरी शहराच्या हायवेवर मधोमध नेहमीच गुरांचे गोहण बसलेले असतात. श्री राजू भागवत यांनी या बेवारस जनावरांच्या सोयीसाठी नगर परिषदेला आतापर्यंत दोनदा लेखी निवेदन दिले आहे परंतू नगरपालिका प्रशासन याकडे बिलकुल लक्ष देत नाही. यामुळे रस्त्यावर केव्हाही अपघात होऊन प्राणहानी होऊ शकते.
तरी नगर परिषद प्रशासनाने या समस्येकडे ताबडतोब लक्ष द्यावे व या बेवारस गुरांच्या मालकांवर सुध्दा कार्यवाही करावी असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते राजू भागवत यांनी केले आहे.