ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वाघाच्या हल्ल्यात गाय ठार, मांगली शेत शिवारातील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
चरण्यासाठी नेलेल्या गुरांच्या कळपातील एका गाईवर वाघाने हल्ला करून तिला ठार केल्याची घटना दिनांक 28 ला दुपारी चार वाजताच्या सुमारास तालुक्यातील मांगली येथील शेतशिवारात घडली. गायीच्या मृत्यूमुळे शेतकऱ्याचे जवळपास 40,000 रुपयांचे नुकसान झाले असून याची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी गाईच्या मालकाने केली आहे.
मांगली येथील वसंता बोढेकर हे नेहमीप्रमाणे आपली गुरे घेऊन शेतशिवारात चराईसाठी गेले असता दबा धरून बसलेल्या वाघाने गाईवर हल्ला करून तिला ठार केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर भद्रावती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.