तालुका क्रीडा समितीची शिक्षक सभा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर तसेच तालुका क्रीडा अधिकारी भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक सत्र २०२५-२६ तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी भद्रावती तालुक्याची क्रीडा शिक्षकांची सभा यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी, भद्रावती येथे घेण्यात आली. या सभेला मार्गदर्शक म्हणून डॉ. प्रकाश महाकाळकर गटशिक्षणाधिकारी भद्रावती, अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधीर मोते, प्रमुख अतिथी जयश्री देवकर तालुका क्रीडा अधिकारी भद्रावती, संयोजक प्रकाश दरेकर, संगणक मार्गदर्शक वर्षा घटे उपस्थित होत्या.
तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा मार्गदर्शन सभेचे आयोजन भद्रावती येथील यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी येथे आयोजित करण्यात आली. या सभेला मार्गदर्शन करताना गटशिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश महाकाळकर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा स्पर्धेचे महत्त्व विशद केले. तसेच वाल्मीक खोब्रागडे संयोजक चंद्रपूर यांनी पावसाळी क्रीडा स्पर्धेसाठी आयोजनाच्या संदर्भात उपस्थित क्रीडा शिक्षकांना मार्गदर्शन केले.
या बैठकीचे संचालन संजय गोळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन विकास दूर्योधन यांनी केले. सभेचे आयोजन क्रीडा शिक्षक प्राध्यापक रमेश चव्हाण यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांनी केले. या बैठकीला तालुक्यातील सर्व शाळेतील शारीरिक शिक्षक मोठ्या संख्येत उपस्थित होते.