पाच वर्ष लोटूनही वृद्ध दांपत्याच्या हत्तेचे रहस्य उलगडले नाही
पोलीस प्रशासन हतबल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती तालुक्यातील चोरा येथील शेतातील घरात कुजलेल्या अवस्थेत वृद्ध पती व पत्नीचा मृतदेह आजच्या दिवशी २८ जुलै ला २०२० मध्ये आढळला होता या घटनेला पोलिसांनी मर्ग दाखल केला तपासात घातपाताचा संशय आल्याने पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता मात्र पोलीस तपासाला पाच वर्षे लोटली तरी हत्येचे आरोपी पोलिसांना गवसले नसल्याने अजूनही आसुटकर कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे . गजानन आसुटकर व ६२ वर्ष व शीला आसुटकर वय ५५ वर्ष राहणार चोरा असे हत्या झालेला वृद्ध पती पत्नीचे नाव आहे गजानन यांचे चोरा येथून दोन किमी अंतरावर शेत आहे शेतात घर होते दोघेही पती-पत्नी शेतात राहत होते तर त्यांचे चार मुले नोकरी व काम धंदा असल्याने भद्रावती येथे राहत होते २८ जुलैला या दोघांचा खाटेवर कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता एकाच वेळेस दोघांचा अकस्मात मृत्यू होणे ही बाब पोलिसांनाही खटकली होती.
तसेच मृतकाची मुले प्रदीप आसुटकर व शरद आसुटकर यांनी आपल्या आई-वडिलांची आत्महत्या नसून हत्या केल्याचा आरोप केला होता. पोलीस तपासा नंतर हत्तेचा गुन्हा दाखल केल्यानंतर तपास चक्रे फिरवली मात्र भद्रावती पोलिसांना हे प्रकरण उलघडले नसल्याने या प्रकरणाचा गुन्हे अन्वेषण विभाग चंद्रपूर यांनी तपास केला त्यानंतर आता हे प्रकरण सीआयडी कड प्रलंबिते आहे. या प्रकरणातील आरोपीचा काही शोध लागला काय हे विचारणा करण्याकरता मृतकाची मुले प्रदीप आसुटकर हे वारंवार कार्यालयात जात असतात मात्र तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत असल्याने त्यांना परत यावे लागते. आपल्या आई-वडिलांच्या हत्यारांचा शोध कधी लागणार व आम्हाला न्याय कधी मिळणार या प्रतीक्षेत अजूनही आसुटकर कुटुंब आस धरून आहे.
ही घटना ही २०२० ची आहे. या घटनेचा प्रथम भद्रावती पोलिसांनी तपास केला त्यानंतर हा गुन्हा २०२२ मध्ये सीआयडी कडे आला या घटनेचा तपास करणारा मी तिसरा अधिकारी आहे. वृद्ध दांपत्याचा मृतदेह हे कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने नेमका मृत्यु कशाने झाला हा एक शर्तीचा तपास आहे.त्यातच पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून घटना परिसरातील २८ जुलै २०२० ची कॉल डिटेल तसेच विविध विभागाची माहिती घेऊन या घटनेतील अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे.
अजित विसपुटे, पोलीस उपधीक्षक चंद्रपूर