ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ज्येष्ठ पत्रकार प्रा.महेश पानसे यांना राज्यस्तरीय ‘उत्कृष्ट पत्रकारीता’ पुरस्कार घोषीत

खा.शरदचंद्र पवार यांचे हस्ते पुण्यात पुरस्कार वितरण

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर:- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा प्रतिष्टेचा राज्यस्तरीय “उत्कृष्ट पत्रकारीता” पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार,समिक्षक,राजकिय विष्लेषक प्रा.महेश पानसे यांना जाहीर झाला आहे.

      राज्य पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन २०२४ दि.१६ मार्च ला पिंपरी चिंचवड(पूणे) येथे संपन्न होत असून राज्याचे जेष्ट नेते खा.शरदचंद्र पवार यांचे हस्ते सदर पुरस्काराचे वितरण व प्रा.महेश पानसे यांचा सत्कार संपन्न होणार आहे.

याच अधिवेशनात राज्य पत्रकार संघाचा प्रतिष्टेचा युद्धवार्ता पुरस्कार,आरोग्य पत्रकारीता पुरस्कार, कृषी पत्रकारिता पुरस्कार,शोध पत्रकारीता पुरस्कार,अभिव्यक्ती पत्रकारीता पुरस्कार महाराष्ट्र, गोवा,कर्नाटक,दिल्ली,गुजरात येथील गुणवंत जेष्ट पत्रकारांना खा.शरद पवार यांचे हस्ते वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.

   प्रा.महेश पानसे यांना याआधीही पत्रकारितेतील “जिवन गौरव पुरस्कार”. “विदर्भ भुषण पुरस्कार”,

“पत्रपंडीत बियाणी राज्य स्तरीय पत्रकारीता पुरस्कार” प्राप्त झालेले आहेत.

      “राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार” घोषीत झाल्याबद्धल प्रा.महेश पानसे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये