25 जुलै रोजी ‘चांदा ज्योती सुपर 100’ प्रवेश परीक्षा

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे आयोजित ‘चांदा ज्योती सुपर 100’ ही प्रवेश परीक्षा 25 जुलै 2025 रोजी जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्तरावर घेतली जाणार आहे. सदर परिक्षेची वेळ 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी दुपारी 12 ते 2.30 पर्यंत तर 11 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत आहे.
नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी स्वतःच्या तालुक्यातील निश्चित परीक्षा केंद्रावरच उपस्थित राहावे. परीक्षेस येताना मूळ आधार कार्ड व त्याची झेरॉक्स प्रत सोबत आणणे अनिवार्य. काळ्या शाईचा बॉलपेन (Black Ball Pen) सोबत आणणे आवश्यक.
परीक्षा केंद्रांची यादी : 1. विश्व शांती विद्यालय, चंद्रपूर–गडचिरोली रोड, सावली, 2. सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर, 3. जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, मांचेरियाल–चंद्रपूर रस्ता, राजुरा, 4. नवभारत विद्यालय, विश्रामगृह रोड, गांधी चौक जवळ, मूल, 5. नेवजाबाई हितकारणी महाविद्यालय, फॉरेस्ट कॉलनी, ब्रह्मपुरी, 6. पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन, वरोरा, 7. थापर हायस्कूल, बल्लारपूर पेपर मिल परिसर, बल्लारपूर, 8. लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालय, बस स्टँड जवळ, भद्रावती, 9. शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, मारेवार चौक, जीवती, 10. कर्मवीर विद्यालय, मार्केट रोड, नागभीड, 11. जनता विद्यालय, श्रीकृपा जूनियर कॉलेज जवळ, पोंभुर्णा, 12. स्व. लक्ष्मणराव कुंदोजवार ज्युनिअर कॉलेज, गोंडपिपरी, 13. सर्वोदय विद्यालय, रेल्वे स्टेशन रोड, सिंदेवाही, 14. विद्या विहार कॉन्व्हेंट हायस्कूल, S.T. वर्कशॉप जवळ, एस.पी. विधी महाविद्यालयाच्या पाठीमागे, तुकूम, चंद्रपूर, 15. न्यू राष्ट्रीय विद्यालय, वडाला पैकू, चिमूर.
अभ्यासक्रम व स्वरूप : 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी विज्ञान (Science), गणित (Mathematics), सामान्य ज्ञान (General Awareness), इंग्रजी (English). सदर अभ्यासक्रम इयत्ता 10 वी राज्य मंडळावर आधारित असेल. 11 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), गणित (Mathematics). सदर अभ्यासक्रम इयत्ता 10 वी राज्य मंडळावर आधारित असेल.
परीक्षा पद्धत : प्रश्नपत्रिका बहुपर्यायी स्वरूपातील (MCQ) असेल. परीक्षा एकाच सत्रात घेतली जाईल.
प्रवेश परीक्षा संदर्भातील सर्व माहिती zpchandrapur.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी व पालकांनी अधिक माहितीसाठी प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर किंवा तालुका शिक्षण अधिकारी, पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा, असे शिक्षणाधिकारी (प्राथ) अश्विनी सोनवणे यांनी कळविले आहे.