पोहरागड येथे शेतकरी जागृती कार्यक्रम संपन्न
माजी जि.प. सदस्य रामराव चव्हाण यांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
बंजारा समाजाचे श्रद्धास्थान,प्रेरणाकेंद्र,शक्ती केंद्रच्या वतीने सा सेवाभूमी कार्यालयात पोहरागड येथे काल ज्ञानप्रकाश लोकसंस्था व वसंत बहार अॅग्रोटे,नागपूर द्वारा जैविकशेती शेतकरी जागृती कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. रामराव राठोड हे प्रयोगशिल शेतकरी होते.
तर प्रमुख उपस्थिती समिक्षक व साहित्यिक मा.विलास राठोड (गोस्तावाळो) होते.याप्रसंगी वसंतराव नाईक साहेबांच्या कृत्वाने पावन झालेल्या पुसद तालुक्यातील भूमीपुत्र शेतकरी विकास अभियानची धुरा खांद्यावर घेवून सातत्याने धडपडणारे सामाजिक कार्यकर्ते माजी जि.प. सदस्य रामराव चव्हाण यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. त्यांच्या यशस्वी प्रयोगातून व मार्गदर्शनातून शेतकऱ्यांना नवी दिशा मिळाली. याप्रसंगी मा.विलास राठोड (गोस्तावाळो) बंजारा समीक्षक व साहित्यिक यांनी उपस्थित शेतकरी बांधवाना मोलाचे मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे हाडाचे शेतकरी व कार्यकर्ते वैजनाथ ढवळे यांनी समयोचित विचार मांडले.
शेतकरी विकास अभियानचे मुख्य संयोजक श्रीपतभाऊ राठोड यांनी संत सेवालाल महाराजांचे अनमोल विचारांनी कार्यक्रमानी सुरुवात करुन जैविकशेती का करायची हे विविध उदाहणे, प्रत्यक्ष केलेले यशस्वी प्रयोग आणि शेतकऱ्यांचे मनोगत याचा सुरेख संगम घालून सविस्तर मार्गदर्शन केले.कार्यक्रमादरम्यान सौ.जयश्रीताई श्रीपत राठोड यांच्या स्वरचित गोरमाटी गितांतून बंजारा समाजांच्या ज्वलंत आणि गंभीर समस्यांना मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला. या प्रसंगी वसंत बहार अॅग्रोटेक द्वारा निवडक शेतकऱ्यांना जैविक प्रॉडक्ट विनामुल्य वितरीत करण्यात आले.
शेवटी सेवाभूमीचे मुख्य संपादक श्री. शंकर आडे द्वारा स्वलिखित सटर पटर हे पुस्तक देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीते कु. राजश्री आडे, दिपाली व अंजली राठोड यांचेही योगदान लाभले.