ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मोहसीन भाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बल्लारपूर येथे तीन दिवसीय आरोग्य तपासणी शिबिर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे

मोहसीन भाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,बल्लारपूर येथे दिनांक 18, 19 व 21 जुलै 2025 या तीन दिवसीय आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलेले आहे.

या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये वर्ग पाचवी ते बारावी पर्यंतचे सर्व विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी केलेली आहे. यामध्ये त्यांच्या नाक, कान, घसा, डोळे तसेच इतर समस्या असल्यास त्यांवर तपासणी करून विद्यार्थ्यांचे स्वास्थ कसे चांगले ठेवता,येईल याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.तसेच त्यांना योग्य औषधी सुद्धा देण्यात आलेल्या आहे. त्याचबरोबर मोठा आजार असल्यास त्यांच्या पालकांना कळविण्यात आलेले आहे.

या तीन दिवसीय आरोग्य तपासणी चे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका असमा मॅडम, पर्यवेक्षिका रच्चावार मॅडम तसेच ग्रामीण आरोग्य रुग्णालय बल्लारपूर ची टीम यांनी यशस्वी केले. याच्या यशस्वीते करिता सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये