भद्रावती न. प.च्या अधिपत्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे ऑडिट स्ट्रक्चर करून दुरुस्ती करावी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
मागील काही महिन्याअगोदर महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा समुद्रकिनारी बसविलेला पुतळा पडला त्या विषयाला घेवून संपुर्ण महाराष्ट्रात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्या अनुषंगाने भद्रावती नगर परिषदेच्या हद्दीत व नगर परिषदेच्या अधीनस्त येत असलेल्या महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळा जुना बसस्टॉपवर उभारण्यात आला.
मात्र डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला खुप वर्षे झाल्याने पुतळ्याचा काही भाग जिर्ण होत आहे. अशातच या पुतळ्याला वातारणातील कमीजास्त होत असलेल्या वातावरणामुळे व इतर प्रदुषणामुळे मोठ्या प्रमाणात हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारतीय जनता पार्टी अनु. जाती मोर्चाच्या महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यांचे ऑडीट स्ट्रक्चर करून तज्ञांच्या मार्गदर्शनात समिती नेमून त्या समितीच्या अहवालानुसार कार्य पुर्णत्वास नेवून सोबतच या पुतळ्याच्या परिसराचे बाबासाहेबांच्या पुतळ्याला शोभेल असे सौदंर्थीकरण करावे. पुतळ्याची हानी कशी टाळता -येईल यावर लवकरात लवकर निर्णय घेवून उपाययोजना करण्यात यावी. जेणेकरून भविष्यात विपरित घटना
घडणार नाही.अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय वानखेडे यांनी मुख्याधिकारी डॉ.विशाखा शेळकी व आमदार करण देवतळे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.