ब्लास्टिंग मुळे बरांज येथील घराचे छत कोसळले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती तालुक्यातील केपीसीएल खुल्या खाणीच्या ब्लास्टिंगमुळे बरांज (मो) येथील घराची छत कोसळल्याची घटना दिनांक २० रोज रविवारला दुपार दरम्यान घडली मंगला बबनराव रणदिवे घर क्रमांक १४१ रा. बरांज (मो) असे घर मालकाचे नाव आहे . घरात ऐकून ६ सदस्य राहत असून कुटुंब आतील घरात असल्याने मोठी जीवित हानी टळली.
बरांज (मो) येथील गावाचे पुनर्वसन झाले नाही मात्र संपूर्ण केपीसीएल कोळसा खाणीने गावाला वेडा घेतला आहे त्यातच कोळसा उत्खनासाठी खाणीत मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग केले जात असल्याने येथील पूर्णता घराला तडे गेले आहे.
यापूर्वीसुद्धा गावातील काही घरे या ब्लास्टिंग मुळे भुईसपाट झाले आहे केपीसीएल कंपनीच्या दुर्लक्षेतेपणामुळे बराज येथील गावाचे अजून पावेतो पुनर्वसन झाले नसल्याने येथील गावकरी आपला जीव मुठीत घेऊन या गावात वास्तव्यात आहे असाच प्रकार राहला तर एखादी मोठी दुर्घटना होणे नाकारता येत नाही. याकडे केपीसील प्रशासन तसेच शासकीय प्रशासनाने पूर्णता दुर्लक्ष केले आहे.