ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
अंढेरा येथे खुलेआम अवैध दारू व गुटखा विक्री सुरू
कारवाई करण्याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
अंढेरा येथे खुले आम अवैध दारू विक्री व गुटखा विक्री सुरू असल्याने सर्वसामान्य नागरिकांना अतोनात त्रास होत असल्याने तत्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी पत्रकार सुरेश इंगळे यांनी ठाणेदार अंढेरा यांना निवेदन देऊन केली आहे.
गावातील मुख्य रस्त्यावर खुले आम अवैध दारू विक्री व गुटखा विक्री सुरू असल्याने शालेय विद्यार्थ्यांना तसेच पुरुष व महिला यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, आमचे कुणीही वाकडे करू शकत नाही अशी भूमिका दारू विक्री व गुटखा विक्री करणाऱ्यांनी घेतली असल्याने भीतीचे वातावरण पसरले असल्याचे नमूद करण्यात आले आहे.