जायंटस परिवाराचे वतीने श्री गुगुळा माता मंदिर परिसरात वृक्षारोपण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
आंतरराष्ट्रीय स्तरावर एनजीओ म्हणून काम करत असलेल्या जायंटस वेल्फेअर फाउंडेशन या संस्थेच्या देऊळगाव राजा शाखेच्या वतीने पर्यावरण समतोल राखण्यासाठी सर्व दूर प्रसिद्ध असलेल्या व नवसाला पावणाऱ्या निसर्गाच्या सान्निध्यात बसलेल्या श्री गुगुळा देवी मंदिर संस्थान परिसरात दिनांक 20 जुलै रोजी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून संगोपनाचे नियोजन करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, सामाजिक, आरोग्य विषयक, शैक्षणिक, पर्यावरण, यासाठी मोठ्या प्रमाणात जायंटस वेल्फेअर फाउंडेशन च्या वतीने काम सुरू आहे देऊळगावराजा ग्रुपच्या वतीने श्री गुगुळा माता मंदिर परिसरात हरितक्रांती निर्माण होण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली केवळ वृक्ष लागवड महत्त्वाची नसून त्याचे संगोपन करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे यावेळी जायंटस ग्रुपचे अध्यक्ष कल्याण सूर्यकांत चांडगे यांनी सांगून वृक्ष लागवडीपेक्षा वृक्ष संगोपन ही काळाची गरज झाली आहे असे सांगितले ,देशात सगळीकडे महाभयंकर वृक्षतोड सुरू असल्याने याचा परिणाम पर्यावरणावर झालेला आहे दिवसेंदिवस तापमानात वाढ होताना दिसून येत आहे जंगले साफ होऊन त्या ठिकाणी टोलिजंग काँक्रिट च्या इमारती निर्माण चे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे पर्यावरणाचा समतोल राखवयाचा असेल तर वृक्ष लागवड व वृक्ष संगोपन ही चळवळ व्हावी असे सांगितले.
यावेळी जायंटस परिवाराचे एडवोकेट पुरुषोत्तम धन्नावत, जुगल किशोर हरकुट, सन्मती जैन, शाखाध्यक्ष कल्याण सूर्यकांत चांडगे, अरुण कायस्थ, डि.के. राठी, राजेश तायडे, राजकुमार भन्साली, सिद्धेश्वर मिनासे यासह नगर परिषदेचे माजी नगरध्यक्ष गोविंद झोरे, संस्थानचे अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप मीनासे, सचिव गोविंद अहिरे, रवी लताड, अनिल बाहेती, निरज पारीख, हेमंत जिंतूरकर, मलकापूर अर्बन कॉपरेटिव बँक शाखा पुसदचे मॅनेजर सुरज मीनासे, मोहन व्यवहारे, परमेश्वर पाटील, उपस्थित होते