ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वार्डातील लोकांनी केला त्या निराधार महिलेचा अंतविधी

रेणुका माता वार्डातील लोकांकडून माणुसकीचे दर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी :- रेणुका माता चौकातील एका देशी दारू दुकाना जवळ बंद गाळ्याचा पायऱ्यावरच “त्या” महिलेने अंदाजे दहा ते बार वर्षपासून तिचा संसार थाटला होता. उन्हाळा,हिवाळा तसेच पावसाळा असो तिने तिथे दिवस रात्र काढले. चौकातील रहिवासी “त्या” निराधार माहिलेला सुमन व सुनंदाबाई नावाने हाक देतं होते. अचानक प्रकृती बिघडल्याने तिला दोन दिवसा अगोदर वार्डातील सामाजिक कार्यकर्त्यांनी उप जिल्हा रुग्णालय ब्रम्हपुरी येथे तिला भरती करण्यात आले मात्र प्रकृती अधिक खालावल्याने दि. १६/०७/२०२५ ला सकाळी मरण पावली.

निराधार महिलेचे एकही नातेवाईक उपस्थित नव्हते मात्र वार्डातील नागरिक माणुसकीचा नात्याने एकत्रित येऊन हिंदू रितिरिवाजानुसार विधिवत मोक्षधाम भूतीनाला येथे अंत्यविधीचा कार्यक्रम पार पाडला. वार्डातील नागरिक व व्यापारी मित्र निराधार महिलेचा हिंदू रितिरिवाजानुसार चौदावीचा कार्यक्रम २९.०७. २०२५ रोज मंगळवारला करण्याचे ठरविले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये