स्नेहाला मिळाला आयआयटी गुवाहाटीमध्ये डिझाईन अभ्यासक्रमासाठी प्रवेश
बिबी गावाचा नावलौकिक वाढला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी येथील स्नेहा राजेंद्र काकडे हिने अत्यंत प्रतिष्ठित असलेल्या आयआयटी गुवाहाटीमध्ये मास्टर ऑफ डिझाईन या नामांकित अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. तिच्या यशस्वी प्रवेशाने संपूर्ण गावाचा गौरव वाढविला आहे.
स्नेहा हिच्या मेहनतीची आणि चिकाटीची ही फलश्रुती परिसरातील युवक-युवतींसाठी प्रेरणादायी ठरत आहे. देशातील सर्वोच्च संस्थांपैकी एक असलेल्या आयआयटी गुवाहाटीमध्ये निवड होणे हे अत्यंत गौरवाचे व आव्हानात्मक काम आहे, आणि ती कामगिरी स्नेहाने करून दाखवली आहे.
स्नेहाच्या या यशाने बिबी गावाचा नावलौकिक राज्यभरात पोहोचवला असून, तिच्या परिवारासह संपूर्ण गावासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे. तिच्या यशाबद्दल गावकरी, शिक्षक, मित्रपरिवार यांच्याकडून भरभरून शुभेच्छा आणि अभिनंदन व्यक्त केल्या जात आहे.