ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वीज पडून तीन दिवसात तिघे जण ठार तर एक जखमी.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे
नागभीड तालुक्यात बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी तीन वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून ओवळा येथील मनोज मांडाळे, किटाळी,(बोर) येथे अविनाश उइके तर आज जीवनापूर येथील गणपत पांडुरंग वलके शेतात ट्रॅक्टर चालवत असताना दुपारी दोन वाजता अचानक पावसाला सुरुवात होताच वीज पडून गणपत वलके वय २९ वर्ष हा मृत्युमुखी पडला असल्याने त्याची तक्रार पोलिस स्टेशन तळोधी येथे करण्यात आली असून तहसील कार्यालय नागभीड येथे देण्यात आली आहे.
पुढील तपास ठाणेदार गुऱ्हे यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दररोज अपघाताची मालिका सुरू असल्याने शेतकरी संकटात सापडला असल्याचे चित्र दिसून येत आहे.