ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्ट्राटेक द्वारे ४० युवकांना वाहन प्रशिक्षण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन, आवारपूर हे नजीकच्या गावाचे सर्व स्तरावरील प्रगती व्हावी यासाठी नेहमी प्रxयत्नशील असते. या वाढत्या लोकसंख्येमुळे बहुतांश युवक बेरोजगार असतात त्यांना कुठेतरी आपल्या कौशल्यावरती रोजगार मिळावा याकरिता अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन ने गावातील ४० युवकांना वाहन प्रशिक्षण देण्याचे ठरविले विशेष म्हणजे त्या ४० युवकांमध्ये ४ मुलींचा समावेश आहे.

चंद्रपूर ड्रायव्हिंग स्कूल, चंद्रपूर यांच्या सहाय्याने ४० युवकांना वाहन प्रशिक्षण देऊन त्यांना टी.आर. परमनंट ड्रायव्हिंग लायसन सुद्धा प्रदान करण्यात येणार आहे. या प्रशिक्षण शिक्षणाचा शुभारंभ अल्ट्राटेक सिमेंट वर्क्स चे युनिट हेड पी.एस. श्रीराम यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाला खालील मान्यवर उपस्थित होते दिपक सुराणा, उपाध्यक्ष टेक्निकल, नमित मिश्रा उपाध्यक्ष, (मानव संसाधन विभाग), नारायण दत्त तिवारी (एच.ओ.डी.) प्रशिक्षक उत्तम काळे हे उपस्थित होते.

या कार्यक्रमाला यशस्वीतेकरिता सी. एस. आर. विभाग प्रमुख प्रतीक वानखेडे, संजय ठाकरे व देविदास मांदाळे यांनी अथक प्रयत्न केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये