वैनगंगा विद्यालय कोलारीत मोफत स्कूल बँग वितरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी :- दिनांक 16/07/2025 रोजी वैनगंगा विद्यालय कोलारी येथे स्व. अभिजित जगनाडे स्मृती प्रतिष्ठान ब्रम्हपुरी च्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बँग वितरीत करण्यात आल्या.
या कार्यक्रमा प्रसंगी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. प्रा. डॉ. देविदास जगनाडे सर व प्रमुख पाहुणे म्हनूण मा. आशिष देविदास जगनाडे व मा. सुवर्णा आशिष जगनाडे उपस्थित होत व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. धनंजय दाते सर तथा शिक्षक वृंद श्री. नागपुरे सर कु. कोल्हे म्याडम कु. प्रधान म्याडम व अवसरे बाबू ,सुरेश देशमुख ,रुपलाल रामटेके उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शन मा. आशिष जगनाडे सरांनी केले तर अध्यक्षीय भाषण डॉ. देविदास जगनाडे सर यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक संकटामुळे शिक्षणापासून वंचित रहावा लागते त्यामुळे शिक्षणासाठी काही अडचणी येऊ नये म्हणून हा उपक्रम आम्ही मागील ८ वर्षापासून सुरु केला आहे असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन नागपुरे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन कोल्हे म्याडम यांनी केले.