रेती माफीया / धोकादायक इसमावर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन, पुलगांव हद्दीतीत रेती माफीया / धोकादायक इसम राज होरीलाल नहारकर, वय ३४ वर्ष, रा. सुदर्शन नगर, पुलगांव ता. देवळी जि. वर्धा याचे विरुध्द पोलीस स्टेशन, पुलगांवचे अभिलेखावर सन २०११ पासून रेती चोरी व वाहतुक तसेच शरीरा विरुध्द एकूण १९ गुन्हे नोंद आहे. ज्यामध्ये स्थानवध्द इसमाविरुध्द वर्धा नदी पात्रातून अवैधरित्या रेतीचे उत्खनन करुन रेतीची चोरटी बाहतुक करुन तस्करी करणे, घातक शस्त्र वाळगुन सार्वजनिक टिकाणी शस्त्राचे धाकावर दहशत निर्माण करणे, साथीदारांसह घातक हत्याराने गंभीर दुखापत करुन शिवीगाळ व मारण्याची धमकी देणे, गैरकायद्याची मंडळी जमवून कट रचून जियानिशी ठार मारण्याचा प्रयत्न करणे, अनाधिकृतपणे घरात प्रवेश करुन दुखापत करणे तसेच अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे नोंद असून सतत गुन्हे करण्याच्या सवईचा गुन्हेगार होता. सन २०११ पासुन स्वानवध्द ईसमाने पोलीस स्टेशन, पुलगांव परीसरात जनसामान्यांच्या मनामध्ये स्वतःची प्रचंड दहशत निर्माण केली होती. त्याच्या दहशतीमुळे अनेक पिडीत त्याचे विरुद पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास सुध्दा धनावत नव्हते. त्यामुळे परीसरातील सर्वजनीक शांतता व सुव्यवस्था भंग होवून सार्वजनीक जिवन विस्कळीत झाले होते. स्थानबध्द इसमाच्या कृत्यांमुळे पोलीस स्टेशन, पुलगांव अंतर्गत येणाऱ्या परीसरामध्ये सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था भंग होत असल्याने त्याच्या गुन्हेगारी कृत्यांवर आळा घालण्याकरीता त्याचे विरुध्द सन २०२२ व २०२४ मध्ये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली होती. परंतु स्थानवध्द इंसम हा अशा प्रतीबंधक कार्यवाहीस सुध्दा जुमानत नसल्याचे व सतत गुन्हे करीत असल्याचे निदर्शनास आले.
त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक, श्री. यशवंत सोळसे पो.स्टे. पुलगांव यांनी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हाथभट्टीवाले, औषधीद्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, रेती माफीया व जिवनावश्यक वस्तुचा काळवातार करणारे यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ (सुधारणा २०१५) अन्वये स्थानवध्द करण्याबाबतचा प्रस्ताव मा. श्री. अनुराग जैन, पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे मार्फतीने मा. जिल्हादंडाधिकारी मा. श्रीमती वान्मची सी. यांचेकडे सादर केला होता. त्या अनुषंगाने मा. जिल्हादंडाधिकारी, वर्धा बांनी दिनांक १६ जुलै २०२५ रोजी स्थानबध्द आदेश जारी करुन त्यास नागपुर मध्यवर्ती कारागृह, नागपुर येथे स्थानवध्द करण्याचे आदेश पारीत करण्यात आल्याने स्थानबध्द आदेशांन्वये त्यास नागपुर मध्यवती कारागृह, नागपुर येथे स्थानबध्द करण्यात आले आहे.
वर्धा जिल्हयामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधीत राहावी या उद्देशाने अशाच प्रकारे रेती माफीया तसेच समाजातील गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक असणाऱ्या व्यक्तीवर एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत कठोर कार्यवाहीचे पुनश्चः संकेत मा. जिल्हादंडाधिकारी, वर्धा श्रीमती वान्मयी सी., तसेच मा. पोलीस अधोक्षक, वां श्रो. अनुराग जैन, यांनी दिले आहे.
सन – २०२४ मध्ये एकुण १९ दारुविक्रेते आणि गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारांना एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत विविध कारागृहामध्ये स्थानबध्द करण्यात आले होते. तसेच सन २०२५ मध्ये अद्याप पावेतो १३ अवैध दारुविक्रेते तसेच गुंड प्रवृत्तीच्या योकादायक व्यक्तींना विविध कारागृहामध्ये स्थानबध्द करण्यात आले आहे. एम.पी.डी.ए. कायद्याच्या तरतुदी अंतर्गत वर्धा जिल्हयात रेती माफीया विरुध्द ही पहीलीच कठोर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे. भविष्यात सुध्दा रेती माफीयांविरुध्द अशा कारवाईचे संकेत दिले आहे.
सदरची कार्यबाही ही मा. श्री. अनुराग जैन, पोलीस अधीक्षक, वर्धा, श्री. राहुल चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी, पुलगांव, पो.नि. विनोद चौधरी, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांचे मार्गदर्शनात स.फी. संजय खरमतारकर, पो.हवा. अमोल आत्राम, पो.हवा. आशिष महेशगौरी स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा, पो.नि. यशवंत सोळसे, पो.हवा. विनोद रघाटाटे, राजु वैद्य, गोपाल बावणकर पोलीस स्टेशन, पुलगांव यांनी केली आहे.