डॉ. हेडगेवार जन्म शताब्दी सेवा समितीला मिळाली सुसज्ज रूग्णवाहिका
श्री. हंसराज अहीर यांचे अथक प्रयत्न

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर: ‘नर सेवा, नारायण सेवा’या ब्रीदवाक्य मानणाऱ्या व आरोग्य, शिक्षण व स्वावलंबन या आयामावर चालणाऱ्या डॉ. हेडगेवार जन्म शताब्दी सेवा समिती, चंद्रपूर (पूर्व विदर्भ) या संस्थेच्या परिसरात आज दि. 16 जुलै 2025 रोजी रूग्णवाहिका लोकार्पण सोहळा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री श्री. हंसराज अहीर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. सदर रूग्णवाहिका ही मौदा महाऔष्णिक विद्युत केंद्र यांच्या मार्फत श्री. हंसराज अहीर यांच्या प्रयत्नाने प्राप्त झाली आहे.
या प्रसंगी मंचावर रा. स्व. सं. चंद्रपूरचे जिल्हा संघचालक श्री. तुषारजी देवपुजारी, रा.स्व.सं. चंद्रपूरचे नगर संघचालक अॅड. रविंद्रजी भागवत, समितीचे मार्गदर्शक श्री. वसंतराव थोटे व हेडगेवार जन्म शताब्दी सेवा समिती चंद्रपूरचे सचिव अॅड. श्री. आशिष धर्मपुरीवार उपस्थित होते.
या कार्यक्रम प्रसंगी श्री. देवपुजारी म्हणाले की, रूग्णसेवा हिच ईश्वरीय सेवा कार्य आहे ते सेवा समिती सन 1989 पासून निस्वार्थ भावनेने करीत आहे व त्यांचे कार्य असेच पुढे चालत राहिल अशा शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रम प्रसंगी अॅड. श्री. भागवत म्हणाले की, सुरूवातीला एका रूग्णवाहिकेपासून सुरूवात करून आज 3 रूग्णवाहिका व 1 चलचिकित्सालयाद्वारे निस्वार्थ सेवा समिती द्वारे दिल्या पूर्व विदर्भात देण्यात जात आहे.
या कार्यक्रम प्रसंगी श्री. वसंतराव थोटे म्हणाले की, समितीने समितीचे पहिले अध्यक्ष स्व. अॅड. मधुकरराव भागवत यांनी सुरवातीला एका रूग्णवाहिकेपासून सुरवात केली. पहिली रूग्णवाहिका द्वारे चलचिकित्सालय एटापल्ली तालुक्यातील 25 गावांमध्ये सुरवातील 10 वर्ष सलग व आता मागील 23 वर्षांपासून समितीद्वारे निस्वार्थ भावनेने रूग्णसेवा दिल्या जात आहे असे सांगितले.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रस्ताविकेत अॅड.श्री. आशिष धर्मपुरीवार यांनी समितीच्या विविध सेवा प्रकल्पांची सविस्तर माहिती प्रस्ताविकेतून दिली. त्यात त्यांनी प्रामुख्याने सांगितले की, रूग्ण उपयोगी साहित्य केंद्र चंद्रपूर, राजुरा, गडचांदूर, चामोर्शी, ब्रम्हपूरी, गडचिरोली, गोंदिया, मुल येथे सुरू आहे. तसेच सेवा समिती तर्फे 2 अॅम्बुलॅन्स सेवा, संस्कार वर्ग, छात्रावास, वाचनालय, साप्ताहिक शिबीर, 1 चल चिकित्सालय, पॅथालॉजी, आरोग्य रक्षक व साप्ताहिक दवाखाना इत्यादी प्रकल्प नियमित सुरू आहे असे सांगितले.
या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष श्री. हंसराज अहीर यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत ते सेवा समितीला सुरूवातीपासून मदत करीत आहेत व यापुढेही करीत राहिल असे आश्वस्त केले. वास्तविक सेवेचा भाव मनात असावा लागतो व तोच ठेवून सेवा समिती उत्कृष्ट काम करतेय असे गौरव उद्गार सेवा समिती बद्दल काढले. रूग्णांना सदर रूग्णवाहिका अत्यंत नाममात्र शुल्कात उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामुळे परिसरातील अनेक रूग्णांना सदर रूग्णवाहिका दिलासा देणारी ठरणार आहे.
या कार्यक्रमात श्री.सी.ए. दामोधर सारडा, डॉ.श्री. अशोक जिवतोडे, श्री. शैलेश बागला, श्री. दिवाकर थोटे, श्री. संजय दानेकर, रा.स्व.सं. विभाग प्रचारक श्री. दिनदयाल कावरे, श्री. सुनिल देशपांडे, युवा नेते रघुवीर अहीर, प्रा. रवि जोगी, प्रा. सचिन वझलवार, सौ. वर्षा रॉय, पुणे येथून श्री. रंजन भागवत व सौ. उत्तरा सुमंत व शहरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता समितीचे कोषाध्यक्ष श्री. संदीप बच्चुवार, संदीप देशपांडे, विजय चिंचमलादपुरे व सेवा समितीच्या सर्व सदस्यांनी पदाधिकाऱ्यांनी व संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे उत्तम प्रास्ताविक व आभार प्रदर्शन श्री. डॉ. सुजित डाकुआ यांनी केले.