विश्वशांती विद्यालयाचे पाच विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र
उज्वल यशाची परंपरा कायम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे द्वारा फेब्रुवारी २०२५ मध्ये पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली त्यामध्ये भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालित मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा प्रथम क्रमांक प्राप्त विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथील वर्ग ८ वी मधील पाच विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले त्यात चैतन्य मुन्ना लोडेल्लिवार, क्रिश रमाकांत बुर्रीवार,नैतिक विश्वेश्वर बोरकुटे,पृथ्वी यादव सहारे,कुमारी संबोधी प्रशांत गोवर्धन या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष तथा शाळा समितीचे अध्यक्ष अनिलभाऊ स्वामी,विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार तसेच सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी वृदांनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.