ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

न.प. च्या पॅनल वरून आर्किटेक रवी पचारे यांना काढून नव्याने आर्किटेकची नियुक्त करा 

विरोधी नगरसेवक श्री अरविंद डोहे यांची मागणी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

मागील पाच सहा वर्षा पासून गडचांदूर नगर परिषद च्या विकास कामाचे अंदाजपत्रक तयार करणे, व आवश्यक मंजुरी घेण्या करिता चंद्रपूर येथील आर्किटेक श्री रवि पचारे यांना पॅनल वर घेण्यात आले. व तेव्हा पासूनच या शहरातील रोड,नाली असो वा ओपन स्पेस सौदरिकरण असो इतर सर्वच कामाचे नगर परिषद कडून त्यांना अंदाजपत्रक बनविणे व संबधित विभागा कडून मंजुरी घेण्याकरिता कार्यादेश देण्यात आला आहे. परंतु त्यांनी अंदाजपत्रकात अनेक चुका केल्या असून विकास खुंटला आहे व न.प. ची आर्थिक नुकसान केली असल्याचे आरोप न.प. चे विरोधी नगरसेवक अरविंद डोहे यांनी केला आहे.

न. प. चे आर्थिक हित लक्ष्यात घेता श्री रवि पचारे यांना न प च्या पॅनल वरून काढून नव्याने योग्य आर्किटेक ला पॅनल वर घेण्याची विनंती मुख्याधिकारी तथा नगराधक्षा कडे निवेदना द्वारे केली आहे.

         सविस्तर या प्रमाणे आहे की, आपल्या न प कडे सिव्हील इंजिनियर असताना सुध्दा विकास कामे लवकर व्हावे व योग्य अंदाजपत्रक तयार करून न प च्या पैश्याची बचत व्हावी या उदांत हेतू ठेवून खाजगी आर्किटेक कडून काम करण्याचा होता.

परंतु श्री रवी पचारे यांचे कडून न प चा कुठलाही हेतू साध्य झालेला दिसत नाही.त्यांच्या प्रत्येक अंदाजपत्रकात चुका आढलल्या आहे.एवढ्येच नव्हे तर काही अंदाजपत्रकात चक्क वाढीव रक्कम जोडून अंदाजपत्रक तयार करून ठेकेदाराला आर्थिक लाभ व न प ची आर्थिक हानी असे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. व त्या कामाचे निविदा काढून कामाचा कार्यादेश देण्यात आला आणि कामाला सुरुवात झाली.मी स्वतः ते अंदाजपत्रक तपासले असता ते माझ्या लक्ष्यात आले लगेच मी मुख्याधिकारी यांचे लक्ष्यात आणून दिले असता ते मान्य करत सदरचे कामाला स्थगिती दिली आणि ते अंदाजपत्रक परत दुरुस्ती करीता पाठविण्यात आले. त्यानंतर काम करण्यात आले परंतु सहा महिने विकास रोखला होता त्याचे काय?

        काही ठिकाणी काँक्रिट रोड चे अंदाजपत्रक तयार करण्यात आले परंतु साईड भरन अंदाजपत्रकात घेण्यात आले नाही त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला.काही ठिकाणी नाली,रोड चे अंदाजपत्रक तयार करण्यात आले परंतु मौक्यावर मोजमाप बरोबर घेण्यात आले नाही त्यामुळे कुठे निधी सेविंग तर कुठे पूर्ण काम होऊ शकले नाही.ओपन स्पेस मधील व्हाल कंपाउंड ईलेक्ट्रिक चे एटम घेण्यात आले नाही.ओपन स्पेस मध्ये लॉन कुठे घेतले नाही तर ज्या ठिकाणी घेतले त्या ठिकाणी खड्डयात माती फिलिंग एटम अंदाजपत्रकात घेतले नाही.त्यामुळे ओपन स्पेस चे काम सन 2020 पासून अजूनही पूर्ण नाही.आज पर्यंत जेवड्या कामाचे अंदाजपत्रक तयार करून संबधित विभाग कडून मंजुरी घेतले त्यात विलंब लावल्यात आले आहे.

        एकंदरीत श्री रवि पचारे यांचे काम योग्य नसून नगर परिषद ला आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.त्यामुळे रवी पचारे यांना न प च्या पॅनल वरून काढून नव्याने आर्किटेक ची नियुक्त करण्याची मागणी विरोधी नगरसेवक अरविंद डोहे यांनी नगराधक्षा तथा मुख्याधिकारी यांचे कडे केली असून यावर काय निर्णय घेतील या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये