ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपुरात ५ ऑगस्ट रोजी भाजपा ओबीसी कार्यकर्ता मेळावा

चांदा ब्लास्ट
देशातील ओबीसी समाजाच्या उन्नती व उत्कर्षासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे अभूतपूर्व योगदान आहे. गत ९ वर्षांच्या कार्यकाळात ओबीसींसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवून केंद्रसरकारने तसेच राज्यातील भाजपा महायुती सरकारने ओबीसी बांधवांना न्याय दिला आहे. भाजपा हाच एकमेव राजकीय पक्ष आहे की, ज्याने ओबीसींच्या न्याय हक्काचे कार्य केले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या ओबीसीभिमूख धोरणांवर मंथन व्हावे या हेतूने दि. ५ ऑगस्ट २०२३ रोजी सायं. ५ वाजता भव्य ओबीसी कार्यकर्ता मेळावा भाजपा ओबीसी मोर्चा चंद्रपूर महानगरच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
चंद्रपूर येथील जैनभवन (पठाणपूरा मार्ग) येथे होत असलेल्या या ओबीसीं कार्यकर्ता मेळाव्यास राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराजजी अहीर, राज्याचे वने, सांस्कृतिक व मत्स्यपालन मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजयजी गाते यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून या मेळाव्यास आ. रामदासजी आंबटकर, डॉ. अशोक जिवतोडे, राहूल पावडे, विजय राऊत, खुशाल बोंडे, प्रमोद कडु, डॉ. मंगेश गुलवाडे, सौ. अंजली घोटेकर, अनिल फुलझेले, विनोद शेरकी, सौ. वंदना संतोषवार प्रभुती व प्रमुख पदाधिकारी यांची या मेळाव्यास उपस्थिती राहणार आहे. भाजप, ओबीसी मोर्चा व पक्षाच्या अन्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तसेच ओबीसी बांधवांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा ओबीसी मोर्चा चंद्रपूर महानगरच्या वतीने करण्यात आले आहे.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये