आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शालेय विद्यार्थ्याची वाहतुक करणाऱ्या वाहन चालक/मालक यांना आवाहन

जिल्ह्यातील सर्व पालकांना आवाहन - स्कुलबस / स्कुल व्हॅन संवर्गात नोंदणी नसलेल्या इतर कोणत्याही खाजगी वाहनांने आपल्या पाल्यास शाळेत पाठवू नये

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्हयामध्ये एकूण ५१५ स्कुल बसेस / स्कुल व्हॅन नोंदणीकृत आहेत. त्यापैकी १९७ स्कुल बस / स्कुल व्हॅन धारकांनी त्यांच्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण न केल्याचे कार्यालयीन अभिलेखावरुन निदर्शनास आले आहे. त्याअनुषंगाने १९७ स्कुलबस / स्कुल व्हॅन धारकांना या कार्यालयाव्दारे नोंदणीकृत डाकेने नोटीस जारी करण्यात आलेल्या आहेत. परंतु सदरच्या स्कुलबस / स्कुल व्हॅन धारकांनी अद्यापपर्यंत त्यांच्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करुन घेतलेले नाही. यावरुन सदरचे वाहन रस्त्यावर चालत आहे किंवा कसे हे निष्पन्न होत नाही.

योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण न केलेल्या स्कुल बस/स्कुल व्हॅन धारकांना या प्रसिध्दीपत्राद्वारे आवाहन करण्यात येते की, त्यांनी आपल्या वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण त्वरीत करुन घ्यावे. अन्यथा मोटार वाहन कायद्यानुसार सदर वाहनचा परवाना/ नोंदणी रद्द करण्याची तरतुद असुन दंडास पात्र आहे.

वर्धा जिल्ह्यातील सर्व पालकांना आवाहन करण्यात येते की, आपले पाल्य ज्या स्कुलबसने / स्कुल व्हॅनने शाळेत जातात त्या वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे वैध असल्याबाबतची खात्री google play Store वरती Mparivahan app व्दारे करण्यात यावी. स्कुलबस / स्कुल व्हॅन संवर्गात नोंदणी नसलेल्या इतर कोणत्याही खाजगी वाहनांने आपल्या पाल्यास शाळेत पाठवू नये. कागदपत्रे वैध असलेल्या स्कुल बस/स्कुल व्हॅनने आपल्या पाल्यास शाळेत पाठविण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, वर्धा यांचेकडून करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये