ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

१०२ रुग्णवाहिका चालक दोन महिन्यांपासून वेतनाविना

कुटुंबियांवर उपासमारीची वेळ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

जिल्हा परिषद आरोग्य विभागांतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत कार्यरत १०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिकांचे चालक गेल्या १५ ते १८ वर्षांपासून ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये व जिल्हा रुग्णालयात रुग्णसेवा देत आहेत. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून त्यांचे वेतन थकवले गेले आहे. त्यामुळे वाहनचालक आर्थिक अडचणीत सापडले असून त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. ‘सांगा साहेब, अशा परिस्थितीत जगायचे तरी कसे?’ असा संतप्त सवाल वाहनचालक संघटनेकडून करण्यात येत आहे.

वाहनचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपासून वेतन न झाल्याने त्यांना घरभाडे, वीजबिल, गॅस सिलिंडर, मुलांचे शिक्षण, कुटुंबीयांचा आरोग्य खर्च, इंधन यासाठी मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. शासनाने वाहनचालकांच्या सेवा थेट कंत्राट पद्धतीने बाह्य संस्थेकडे दिल्यामुळे अनेक वर्षे सेवा दिलेल्या चालकांचे भविष्य अधांतरीत

झाले आहे. या पार्श्वभूमीवर वाहन चालक संघटनेने उच्च न्यायालयाच्या मुंबई, औरंगाबाद व नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ‘समान काम, समान वेतन देण्याचे आदेश दिले होते. तसेच रोजंदारी तत्वावर काम करणाऱ्या चालकांना अप्पर कामगार आयुक्तांनी निश्वित केलेले मानधन देण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, तरीसुद्धा दोन महिन्यापासून १०२ रुग्णवाहिका चालकांचे वेतन थकित आहे. त्यामुळे वाहनचालकांची उपजीविका धोक्यात आली आहे.

वाहनचालकांचा आंदोलनाचा इशारा

चंद्रपूर जिल्हातील १०२ रुग्णवाहिका वाहनचालकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, लवकरात लवकर वेतन मिळाले नाही, तर आम्ही रुग्णवाहिका उभ्या करू आणि आंदोलन छेडू. त्यामुळे जर एखादी अनुचित घटना घडली अथवा एखाद्या वाहनचालकाचा मृत्यू झाला तर त्याची पूर्ण जबाबदारी शासन व जिल्हा प्रशासनाची राहील त्यामुळे शासनाने तात्काळ हस्तक्षेप करून १०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिका चालकाचे दोन महीण्याचे थकीत वेतन अदा करावे, अशी मागणी होत आहे

      चंद्रपूर जिल्हा परिषद व सिव्हिल सर्जन अंतर्गत जवळपास ३०-३५ वाहन चालक आम्ही २४/७ सेवा पुरवितो कोरोणासारख्या माहमारीत आम्ही आमच्या जिवाची पर्वा न करता सेवा पुरवली आम्हा वाहन चालक यांचे कधीच महीण्याला पगार होत नाही दोन महिने चार महिने पगाराची वाट पाहवी लागते आम्हा वाहन चालक बंधुवर उपासमारीची वेळ आली आहे येत्या आठ दिवसांत पगार जमा नाही झाले तर आम्ही सर्व वाहन चालक काम बंद आंदोलन करु व सर्वस्व जबाबदारी प्रशासनाची राहील 

       उमेश गोलेपल्लीवार 

वाहन चालक चंद्रपूर जिल्हा संघटना अध्यक्ष

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये