भा.ज.प.च्या वतीने ८ जुलैला नगरपरिषदेवर चिखल फेक आंदोलन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रह्मपुरी :- शहरात भूमीगत गटार लाईनच्या कामामुळे संपूर्ण शहरभर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. आम जनतेला घराच्या बाहेर निघणे तसेच शालेय विद्यार्थ्यांना शाळेत सुद्धा जाणे कठीण झाले आहे. आजारी व्यक्तीला दवाखान्यात घेऊन जाणे सुद्धा कठीण झाले आहे. या गटर लाईनचे नियोजन अत्यंत बेजबाबदार आणि अर्धवट स्वरूपाचे असल्याचे सर्वत्र चित्र दिसुन येत आहे. याबाबतीत वारंवार लक्ष वेधूनही नगर परिषद प्रशासनाकडून कोणत्याही ठोस कारवाई करण्यात आलेली नाहीकामाचे नियोजन, देखरेख व वेळेवर पुनबांधनी या सर्व बाबींमध्ये गंभीर त्रुटी दिसुन येत आहे.
यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी, सुरक्षिततेची आणि मुलभूत नागरी हक्कांशी थट्टा आहे. असे भारतीय जनता पक्षाच्या वतीने पत्रकार परिषदेत भाजपा शहर अध्यक्ष प्राचार्य सुयोग बाळबुधे यांनी सांगितले. जर ही परिस्थिती नगर परिषदेने पुढील सात दिवसात तात्काळ सुधारावी अन्यता भाजपाच्या वतीने नगर परिषदेवर चिखलफेक आंदोलन करण्यास भाग पाडेल आणि याची सर्वस्वी जबाबदारी नगर प्रशासनाची राहिल अशा प्रकारचे निवेदन नगर परिषद मुख्याधिकारी यांना दिले आहे. चिखलफेक आंदोलन ८ तारखेला मंगळवारला भाजपाच्या वतीने करण्यात येत आहे असे पत्रकार परिषदेत शहर अध्यक्ष भाजपा प्रा. सुयोग बाळबुधे यांनी सांगितले आहे.
भाजपाच्या वतीने माजी नगरसेवक मनोज भुपाल, मनोज वठे, तनय देशकर, साकेत भानावर, प्रा. अशोक सालोटकर, पवन जयस्वाल, स्वप्नील अलगदेवे उपस्थितीत होते.