ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आषाढी एकादशीनिमित्‍त पायदळ वारीचे भव्य आयोजन – चंद्रपूर ते तीर्थक्षेत्र वढा

मा.आ.डॉ. सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्रपरिवार तर्फे भव्य स्वागत

चांदा ब्लास्ट

 आषाढी एकादशीच्या पवित्रपर्वा निमित्ताने तीर्थक्षेत्र वढा (जि. चंद्रपूर) येथील विठ्ठल-रुक्माई मंदिराकडे पारंपरिक पायदळ वारीचे भव्य आयोजन करण्यात आले. या वारीची सुरुवात चंद्रपूर येथील महाकाली मंदिरापासून झाली.

या पवित्र वारीचे स्वागत आदरणीय डॉ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली, डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वात अत्यंत उत्साही व भक्तिमय वातावरणात करण्यात आले.

वारीच्या स्वागतासाठी प्रकाश धारणे, किरणताई बुटले,नम्रताताई आचार्य ठेमसकर, उमेश आष्टनकर, सचिन कोतपल्लीवार, रवी लोणकर, सोहम बुटले, अमित निरंजने, प्रवीण उरकुडे आणि सुधीर भाऊ मित्र परिवाराच्या असंख्य सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

या वारीचे नेतृत्व संत श्री चैतन्य महाराज करीत होते. तसेच शंकर वरारकर, सरपंच किरण बांदुरकर, तनुश्री बांदलकर, बाळकृष्ण झाडे, शंकर वासेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

वारीदरम्यान पांडुरंग – रुक्मिणी – विठ्ठल यांच्या गजरामध्ये भक्तगण हरखून गेले. सर्व वारकऱ्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. जटपुरा गेट येथे रिंगण घालून घोड्याच्या तालमीत जयजयकार झाला आणि भक्तीमय वातावरणात सर्वांच्या चेहऱ्यावर विठ्ठलभक्तीचे तेज झळकत होते.

संपूर्ण वारीत सुधीर भाऊ मित्र परिवारातर्फे वारकऱ्यांचे भरभरून स्वागत करण्यात आले आणि भक्तिमय, एकात्मतेने भारलेले वातावरण तयार झाले.

या भक्ती, समर्पण आणि सामाजिक एकतेच्या प्रतीक असलेल्या पवित्र पायदळ वारीचे तीर्थक्षेत्र वढा येथे प्रस्थान झाल्याने आषाढी एकादशीचे औचित्य अधिक मंगलमय झाले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये